मुंबई - बॉलिवूडचा किंग म्हणून प्रेमानं ओळखला जाणाऱ्या शाहरुख खानची कथा त्याच्या उत्तुंग प्रतिभेची, चिकाटी आणि अफाट महत्त्वाकांक्षेची खास गोष्ट आहे. सिनेमाच्या कथेपेक्षा अधिक रंजक असलेल्या त्याच्या गोष्टीत भरपूर रोमान्स आहे, साहस आहे आणि पाठ भिंतीला लावून लढणाऱ्या योद्धाची जिद्द आहे, अनेक चढ उतार आहेत, यशाचं शिखर आहे आणि उतारवरील घसरगुंडी आहे, फिनिक्सची भरारी आहे, अनेक ट्विस्ट असलेला ड्रामा आहे. त्याची जीवनकथा लाखो लोकांच्या हृदयाला भिडणारी आहे.
नवी दिल्ली येथे जन्मलेल्या शाहरुखनं पहिल्यांदा 1989 मध्ये 'फौजी' या टेलिव्हिजन मालिकेतील भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. यामध्ये त्यानं प्रशिक्षण घेत असलेल्या अभिमन्यू राय या तरुण सैनिकाची भूमिका साकारली होती.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) सुरुवातीला मिळालेल्या या संधीमध्ये त्यानं आपल्या प्रतिभेचा चमत्कार दाखवला. परंतु प्रेक्षकांना हे माहीत नव्हतं की ही केवळ एका दिग्गज कारकीर्दीची सुरुवात आहे.
'फौजी' नंतर, शाहरुख खान 'सर्कस' आणि इतर काही टीव्ही शोमध्ये दिसला आणि हळूहळू चित्रपट उद्योगात येण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) 1992 मध्ये किंग खाननं 'दीवाना' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. यातून त्यानं केवळ बॉलीवूडमध्येच प्रवेश केला नाही तर त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) रोमँटिक हिरोचं त्यानं केलेलं चित्रण प्रेक्षकांमध्ये खोलवर प्रबाव पाडून गेलं. खरंतर त्याकाळात 'डर' (1993), 'बाजीगर' (1993), आणि 'अंजाम' (1994) यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकी स्वरुपाची ग्रे आणि अपारंपरिक भूमिका करण्याचा त्याचा धाडसी निर्णय होता. यामुळेच तो इतराहून वेगळा ठरला आणि त्यानं आपल्या अभिनय क्षमतेतून आपलं अष्टपैलूत्व दाखवून दिलं.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (1995) या चित्रपटाने शाहरुखची कारकीर्द गगनाला भिडली. यामध्ये त्यानं केवळ प्रेक्षकांच्या मनावर कब्जा मिळवला नाही तर बॉलीवूडचा "किंग ऑफ रोमान्स" म्हणून स्वत: ला प्रस्थापित केलं.
काजोल आणि राणी मुखर्जी यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींबरोबरच्या त्याच्या सहकार्यामुळे अनेक आयकॉनिक चित्रपट आले. 'दिल तो पागल है', 'कुछ कुछ होता है', आणि 'कभी खुशी कभी गम' (2001); यातील प्रत्येक चित्रपटानं खोल भावनिक संबंध व्यक्त करण्याची आणि खराखुरा रोमान्स वाटण्याची त्याची क्षमता अधोरेखीत केली.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) शाहरुख खान म्हणजे रोमान्सचा किंग असा शिक्का कायमस्वरुपी स्वतःवर मारण्यास शाहरुखनं नकार दिला. त्यानं अनेक प्रकारच्या भूमिकामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. 'स्वदेस' मध्ये त्यानं नासाच्या शास्त्रज्ञाची साकारलेली भूमिका अवर्णनिय अशीच होती. त्याच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) शाहरुख खान यानं 'चक दे! इंडिया' या चित्रपटात एका बदनाम हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारली. तो केवळ रोमँटिक हिरो म्हणूनच योग्य आहे असं म्हणणाऱ्या समीक्षकांनाही त्यानं यातून खोटं ठरवलं.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) किंग खाननं आपला प्रभाव अभिनयाच्या पलीकडे वाढवत रेड चिलीज एंटरटेनमेंटसह फिल्म निर्मितीमध्ये प्रवेश केला. या कंपनीने 'मैं हूं ना' आणि 'ओम शांती ओम'सह अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) सिनेमात अफाट यश मिळवत असतानाच तो इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रँचायझी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचा सह-मालक बनला आणि भारतीय मनोरंजनावर त्याचा प्रभाव आणखी वाढला.
जसजशी त्यांची कारकीर्द पुढे सरकत गेली, तसतसे शाहरुख खानच्या लोकप्रियतेच्या सीमा ओलांडल्या गेल्या. फ्रान्समधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला जीवनगौरव पुरस्कारासह आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा आणि मान्यता मिळाली.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) आकर्षक व्यक्तीमत्वामुळे जगभरातील प्रेक्षकांना त्यानं आपलंसं केलं. त्यानं जगभरातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याचं स्थान सुरक्षित केलं आहे. आज जगातील सर्व खंडात त्याचे फॅन्स क्लब पसरले आहेत.
सुपरस्टार्सनाही अनेक आव्हानांचा, अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि शाहरुख खानही त्याला अपवाद नव्हता. 'फॅन' आणि 'झिरो' सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर निराशा केल्यानंतर, समीक्षकांनी त्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह लावण्यास सुरुवात केली.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) परंतु 'पठाण' मधील ब्लॉकबस्टर पुनरागमनामुळे शाहरुख खानची लवचिकता पुन्हा एकदा चमकली. या चित्रपटाने बॉक्स-ऑफिसचे विक्रम मोडीत काढलो आणि किंग खान हाच सदासर्वदा यशाचा चिरस्थायी धनी असल्याचं दाखवून दिलं.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) 2023 मध्ये शाहरुख खाननं अॅटली दिग्दर्शित 'जवान' या अॅक्शन-पॅक थ्रिलर चित्रपटासह त्याचा वारसा पुन्हा जपण्याचं काम सुरू ठेवलं. यापूर्वी कधीही पाहिला नव्हता अशा रुपात शाहरुख या चित्रपटाच्या निमित्तानं पडद्यावर झळकला. 'जवान'ने केवळ बॉक्स ऑफिसवरच वर्चस्व गाजवले नाही तर भारतीय सिनेमासाठी नवीन मानकेही प्रस्थापित केली. यामुळे शाहरुख खानचा सिनेमॅटिक पॉवरहाऊस म्हणूनही दर्जा वाढला.
शाहरुखनं राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या कॉमेडी-ड्रामा चित्रपटातही जबरदस्त भूमिका साकारली. यामध्ये विकी कौशल आणि तापसी पन्नू यांनीही मुख्य भूमिका केल्या होत्या.
शाहरुख खान फिल्मी प्रवास (ANI) 'फौजी' ते 'जवान' पर्यंतचा शाहरुख खानचा प्रवास उत्कटता, कठोर परिश्रम आणि लवचिकतेच्या सामर्थ्याचा दाखला आहे. त्यानं केवळ बॉलीवूड स्टारडमची नव्याने व्याख्याच केली नाही तर जागतिक स्तरावर भारतीय चित्रपट लोकप्रिय करण्यातही त्यानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याची ही अनेक चढ उताराची कथा असंख्य महत्त्वाकांक्षी अभिनेत्यांना प्रेरणा देत असते. दृढ निश्चय आणि आत्मविश्वास असेल, चिकाटी असेल तर जगात काहीही अशक्य नाही याची शिकवणच तो इतरांना देत आला आहे.