मुंबई - Shah Rukh Khan : 'हुरुन इंडिया रिच लिस्ट'मध्ये शाहरुख खानला स्थान मिळालं आहे. या यादीत अनेक दिग्गज उद्योगपतींच्या साथीनं शाहरुख खानचं आहे. आता फॉर्च्युननं 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत शाहरुख खानचं नाव आघाडीवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखनं सर्वाधिक 92 कोटी रुपयांचा कर भरला आहे. या यादीत शाहरुख खानबरोबर सलमान खान, अमिताभ बच्चन आणि कपिल शर्मा यांनीही स्थान मिळलं आहे. दरम्यान या यादीत कपिल शर्मानं अल्लू अर्जुनला मागे टाकले आहे.
शाहरुख खाननं भराला सर्वाधिक कर : 2023 मध्ये शाहरुखने तीन सुपरहिट चित्रपट बॉक्स ऑफिसला दिले आहेत, 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. शाहरुखनं 2023 मध्ये या तीन चित्रपटांमधून 2.5 हजार कोटींहून अधिक कमाई केली होती. याशिवाय एका वर्षात एवढी कमाई करणारा शाहरुख खान हा एकमेव अभिनेता ठरला. शाहरुख खान आणि इतर सेलिब्रिटींनी जाहिरातींमधून कमावलेल्या उत्पन्नाचाही या करात समावेश आहे. या यादीतील टॉप 5 टॅक्स भरणाऱ्या कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर यात साऊथ स्टार थलपथी विजय दुसऱ्या स्थानावर आहेत. विजयनं 80 कोटी रुपयांचा कर भरला आहे.