महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Jyothika thanks Shaitan team : "शैतान हा एक प्रवास होता" म्हणत, ज्योतिकाने 'शैतान'च्या रीलसह मानले टीमचे आभार - Jyothika thanks Shaitan team

Jyothika thanks Shaitan team : अभिनेत्री ज्योतिकाचं शैतानमधील भूमिकेबद्दल खूप कौतुक होतंय तब्बल 26 वर्षानंतर हिंदी सिनेमात पुनरागमन केलेल्या ज्योतिकानं 'शैतान' चित्रपटाच्या शूटिंगच्या पडद्यामागील रंजक गोष्टी असलेले एक रील शेअर केले आहे. तिला हा चित्रपट म्हणजे आनंदाचा, आठवणींचा सुंदर प्रवास वाटतो.

actress Jyothika
अभिनेत्री ज्योतिका

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 10:48 AM IST

मुंबई -Jyothika thanks Shaitan team : दोन दशकाहून अधिक काळानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलेल्या अभिनेत्री ज्योतिकाचे 'शैतान' चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वत्र कौतुक होतंय. अजय देवगण आणि आर माधवन यांच्याही भूमिका असलेल्या 'शैतान'मध्ये ज्योतिकाने अभिनेत्री जानकी बोडीवालाच्या आईची भूमिका साकारली होती. आता 'शैतान'च्या यशानंतर अभिनेत्री ज्योतिकानं इन्स्टाग्रामवर या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटाच्या शूटिंगच्या पडद्यामागील रंजक गोष्टी असलेले एक रील शेअर केले आहे.

ज्योतिकानं या रीलच्या पोस्टला सुंदर कॅप्शन दिलंय. तिनं लिहिलंय, "काही चित्रपटांना केवळ डेस्टिनेशन असतात, पण शैतान हा एक प्रवास होता. आनंदाचा, आठवणींचा, सर्जनशीलतेचा, प्रतिभेचा आणि आयुष्यभरासाठी मित्र जमवण्याचा तो एक प्रवास होता. अजय देवगण फिल्म्स, पॅनोरमा स्टुडिओज आणि जिओ स्टुडिओज यांचे या प्रवासात मलाही सामील करुन घेतल्याबद्दल आभार. संपूर्ण टीमला धन्यवाद."

ज्योतिकाच्या या सुंदर रीलमध्ये भारतात आणि परदेशात झालेल्या शुटिंग दरम्यानचे सुंदर क्षण दिसतात. यामध्ये अजय देवगण, तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील सहकलाकार आर माधवन, 'शैतान'मध्ये तिच्या मुलीची भूमिका केलेली जानकी बोडीवाला, तिचा पती आणि तमिळ फिल्म्सचा सुपरस्टार सुर्या आणि चित्रपटाची टीममधील सहकारी दिसत आहेत.

पडद्यावर आईची व्यक्तीरेखा साकारणे आणि खऱ्या आईष्यातही आई असणे याबद्दल बोलताना ज्योतिका म्हणाली, "चित्रपटामध्ये असे अनेक प्रसंग होते ज्यामुळे माझ्यातील मातृत्वाला साद मिळाली, परंतु मला माहिती नाही की, मी मला ते खरंच उलगडून दाखवायची इच्छा होती, पण यातील एका महत्त्वाच्या प्रसंगामुळे मला हा चित्रपट स्वीकारावा असे वाटले. मला असं वाटतं की, हा चित्रपट तुम्हाला सातत्यानं आठवण करून देत होता की किशोरवयीन मुलीसाठी किती जबाबदारीने वागावे लागतं आणि आई आणि वडील आपल्या मुलांसाठी संरक्षक म्हणून या प्रवासात कोणती भूमिका बजावत असतात."

अभिनेत्री ज्योतिका पुढं म्हणाली की, " मला वाटतं की, एक आई म्हणून अगदी सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत या चित्रपटात ती भावना आणि जबाबदारी आहे. सतत तुमच्या मुलीचे संरक्षण झालं पाहिजे अशी ही एक भावना होती . मला वाटतं जोही पालक हा चित्रपट पाहील त्याचीही हीच भावना असेल."

'शैतान' हा 'वश' शीर्षक असलेल्या आणि गुजराती भाषेत गाजलेल्या चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचं सांगितलं जातं. हा चित्रपट जिओ स्टुडिओज, अजय देवगण फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल या बॅनर्सच्या वतीने सादर करण्यात आला. अजय देवगण, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी 'शैतान'ची निर्मिती केली होती. देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत देऊन कथानकाची धार आणखी वाढवण्याचं काम केलं. 8 मार्च रोजी 'शैतान' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांसह समीक्षकांच्याही पसंतील उतरला.

हेही वाचा -

  1. अजय देवगण आर माधवन आणि ज्योतिका स्टारर 'शैतान'ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई
  2. 'शैतान' एक्स रिव्ह्यू: अजय, आर माधवनच्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या का? घ्या जाणून मते...
  3. मनोज बाजपेयी अभिनीत 'भैय्या जी'चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details