महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कमल हसन स्टारर 'इंडियन 2' ला घसरण, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'नं वेग पकडला - Sarfira Vs Indian 2 Box Office - SARFIRA VS INDIAN 2 BOX OFFICE

Sarfira Vs Indian 2 Box Office Collection Day 3 : भारतीय बॉक्स ऑफिसवर कमल हासनचा 'इंडियन 2' आणि अक्षय कुमारचा 'सरफिरा' या दोन मोठ्या चित्रपटांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. यामध्ये कोणी बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Sarfira Vs Indian 2
इंडियन 2 आणि सरफिरा बॉक्स ऑफिस (Sarfira Vs Indian 2 poster)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 3:03 PM IST

मुंबई - Sarfira Vs Indian 2 Box Office Collection Day 3 : 12 जुलै रोजी रिलीज झालेले 'इंडियन 2' आणि सरफिरा बॉक्स ऑफिसवर लक्ष वेधून घेत आहेत. दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं असून 'इंडियन 2' चित्रपटाबद्दलची नकारात्मक समीक्षणे आल्यानंतरही चांगलं ओपनिंग मिळालं होतं. परंतु नंतर त्याची कमाईत घट होत असल्याचं आढळून आलं. दुसरीकडे, सकारात्मक रिव्ह्यू मिळालेल्या सरफिराची सुरुवात संथ होती पण ती आता चित्रपट वेग पकडत आहे.

शंकर दिग्दर्शित 1996 च्या आयकॉनिक चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'इंडियन 2' मध्ये कमल हासननं सेनापतीची भूमिका साकारली आहे, याची जोरदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी त्याने 25.6 कोटी रुपयांची कमाई केली. परंतु, आठवड्याच्या शेवटी त्याची गती कमी झाली, कमाईच्या संकलनात घट झाली. रविवारपर्यंत, त्याची एकूण देशांतर्गत कमाई 58.9 कोटी होती, ज्यामध्ये तामिळ आवृत्तीचे योगदान 41.2 कोटी, तेलुगू आवृत्ती 13.9 कोटी आणि हिंदी आवृत्तीचे 3.8 कोटी होते, असे इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवालात म्हटले आहे.

  • इंडियन 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 1 - 25.6 कोटी रुपये
  • इंडियन 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 2 - 18.2 कोटी रुपये
  • इंडियन 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 3 - 15.1 कोटी रुपये

इंडियन 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन आतापर्यंत 58.9 कोटी रुपये

दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तमिळ चित्रपट 'सूरराई पोत्रू'च्या रिमेकमध्ये बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारची भूमिका असलेल्या सरफिराची सुरुवात अधिक माफक होती. सकारात्मक समीक्षणे असूनही, पहिल्या दिवशीची कमाई 2,5 कोटी इतकी झाली. मात्र, आठवड्याच्या शेवटी या चित्रपटानं प्रेक्षकांच्या संख्येत वाढ नोंदवली आणि आठवड्याच्या शेवटी एकूण 11.85 कोटी रुपयांची कमाई केली.

  • सरफिरा बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 1 - 2.5 कोटी रुपये
  • सरफिरा बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 2 - 4.25 कोटी रुपये
  • सरफिरा बॉक्स ऑफिस कलेक्शन डे ३ - ५.१ कोटी रुपये

'सरफिरा'चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आतापर्यंत 11.85 कोटी रुपये

दरम्यान, प्रभासची 'कल्की 2898 एडी' हा चित्रपटा चमकदारपणे कामगिरी करत आहे. आतापर्यंत चित्रपटानं 1000 कोटींहून अधिक जागतिक कलेक्शन गाठले आहे. बॉक्स ऑफिस वर्चस्वाची लढाई जसजशी वाढत आहे, तसतसे 'इंडियन 2' आणि 'सरफिरा' हे चित्रपट कल्की 2898 एडीसमोर मोठं आव्हान उभे करण्यात अपयशी ठरत आहेत.

हेही वाचा -

'सरफिरा' आणि 'इंडियन 2' चित्रपटांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद, पाहा कमाईचे आकडे - SARFIRA AND INDIAN 2

ABOUT THE AUTHOR

...view details