महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा'चा ट्रेलर होईल 'या'दिवशी रिलीज - SARFIRA TRAILER - SARFIRA TRAILER

Sarfira Trailer : बॉक्स ऑफिसवर 'बडे मियाँ छोटे मियाँ'नंतर अक्षय कुमार 'सरफिरा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार याबद्दल आता माहिती समोर आली आहे.

Sarfira Trailer
सरफिराचा ट्रेलर ('सरफिरा' ट्रेलर (IMAGE- IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 11:33 AM IST

मुंबई - Sarfira Trailer :बॉक्स ऑफिसवर 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या अपयशानंतर बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार त्याच्या पुढील चित्रपट 'सरफिरा'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'सरफिरा' हा साऊथ सुपरस्टार सूर्या स्टारर चित्रपट 'सूरराई पोत्रू'चा हिंदी रिमेक आहे. अक्षय कुमारचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 13 फेब्रुवारी 2024 रोजी अक्षय कुमार आणि सूर्या यांनी चित्रपटाचे नाव 'सरफिरा' हे घोषीत केले होते. दरम्यान या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचं ट्रेलर लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारच्या 'सरफिरा' चित्रपटाचा ट्रेलर 12 जूनला रिलीज होईल.

'सरफिरा'चा ट्रेलर : जंगली म्युझिक कंपनीनं 'सरफिरा'चे म्युझिक हक्क विकत घेतले आहेत. साऊथचा सुपरस्टार सूर्याबरोबर 'सूरराई पोत्रू' हा चित्रपट बनवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा प्रसाद यांनी 'सरफिरा'चं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाची निर्मिती 'एअरलिफ्ट', 'बेबी', ' जय भीम ', ओएमजी 2', 'टॉयलेट एक प्रेम कथा', अरुण भाटिया (गुड फिल्म्सची कॅप), सूर्या आणि ज्योतिका (2डी एंटरटेनमेंट), विक्रम मल्होत्रा (2 डी एंटरटेनमेंट) हे करत आहेत. या चित्रपटाला जीव्ही प्रकाश कुमार यांनी संगीत दिलंय. अक्षय कुमारच्या 'सराफिरा' या चित्रपटात परेश रावल, राधिका मदन, सीमा बिस्वास मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान या चित्रपटाची कहाणी ही शालिनी उषादेवी आणि पूजा तोलानी यांनी लिहिली आहे.

अक्षय कुमार वर्कफ्रंट : 'सरफिरा' या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री ज्योतिका आणि तिचा पती सुर्या विशेष भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'खेल खेल में ', 'स्काय फोर्स', 'वीर दौडाले सात', 'सी शंकरन बायोपिक', 'हाउसफुल 5','साइको', 'हेरा फेरी 3', 'जॉली एलएलबी 3', 'राउडी राठौर 2' चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, रवीना टंडन, अनिल कपूर, सुनील शेट्टी, लारा दत्ता, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, परेश रावल आणि इतर कलाकरांबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'भूल भुलैया'मध्ये अक्षय कुमारनंतर सलमान खानची जागा घेऊ शकतो कार्तिक आर्यन - kartik aryan replaces salman khan
  2. 'कल्की 2898 एडी'च्या ट्रेलरसाठी काउंट डाऊन सुरू, सर्वांचं लक्ष यूट्यूब व्ह्यूजवर - KALKI 2898 AD
  3. बॉलिवूड आणि साऊथकडील सेलिब्रिटींनी 2024 च्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केल्या पोस्ट शेअर - World Environment Day 2024

ABOUT THE AUTHOR

...view details