मुंबई - Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अनेक कारणांमुळे चर्चेत असते. ती तिच्या स्टाईलिश अंदाजामुळे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तिच्या बाजूला विमानात एक एअर होस्टेस आणि दोन कॅप्टन असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एअर होस्टेसनं चुकून तिच्या महागड्या कपड्यांवर ज्यूसचा ग्लास सांडला. यानंतर तिला खूप राग आला. तिचा हा व्हिडिओ एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सारा खान गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसत आहे.
सारा अली खाननं शेअर केले सुंदर काश्मीरमधील फोटो : गेल्या बुधवारी 24 जुलै रोजी सारा अली खाननं तिच्या काश्मीर व्हेकेशनची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली होती. सारानं हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "थोडी शांतता." फोटोत तिचे मित्र - मैत्रिणी तेथील स्थानिकांबरोबर चांगला वेळ घालवताना दिसत आहे. याशिवाय ती काश्मीरच्या खोऱ्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. साराचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलं, "सारा तू फोटोमध्ये खूप छान दिसत आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "सारा तुझे डोळे हे अॅपलसारखे आहेत." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "काश्मीरसारख्या स्वर्गात सुंदर व्यक्ती." याशिवाय काहीजण या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून साराचं कौतुक करताना दिसत आहे.