मुंबई -Sara Ali Khan 29th Birthday:अभिनेत्री सारा अली खान 12 ऑगस्ट रोजी 29 वर्षांची झाली. आता तिनं तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. 12 ऑगस्ट रोजी रात्री, सारानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "आनंद, आनंद आणि कृतज्ञता. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद." शेअर केलेल्या फोटोमध्ये सारा ही पांढऱ्या पारंपारिक पोशाखात असून ती गणपतीच्या सुंदर सजवलेल्या मूर्तीशेजारी बसलेली आहे. तिची रुम रंगीबेरंगी फुलांनी सजलेली फोटोत दिसत आहे. दुसऱ्या फोटोत सारा ही एका मुलाबरोबर दिसत आहे. या फोटोमध्ये तो मुलगा साराला वाढदिवसाचे कार्ड देत आहे. हे गिफ्ट मिळाल्यानंतर सारा खूप खूश आहे.
सारा अली खानचा वाढदिवस : याशिवाय एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे, यामध्ये साराच्या केक कटिंग करत आहे. व्हिडिओत सारानं पांढरा आणि गुलाबी रंगसंगतीचा सूट परिधान केला आहे. दरम्यान व्हिडिओत केकवरील मेणबत्ती जळताच सारा घाबरून मागे सरकत असल्याचं दिसत आहे. मेणबत्त्या विझवताना तिचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. साराच्या साध्या पोशाखामुळे तिचे चाहते सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. याशिवाय अनेकजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच काहीजण तिच्या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.