महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'या' कारणामुळे संजय दत्तनं 'वेलकम टू द जंगल' चित्रपटातून घेतली माघार - sanjay dutt exits from welcome 3 - SANJAY DUTT EXITS FROM WELCOME 3

Sanjay Dutt Welcome 3 : अक्षय कुमार स्टारर 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून आता संजय दत्तनं माघार घेतली असल्याचं समजत आहे.

Sanjay Dutt Welcome 3
संजय दत्त वेलकम टू द जंगल (संजय दत्त (Akshay Kumar- Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 4:56 PM IST

मुंबई - Sanjay Dutt Welcome 3 : अभिनेता संजय दत्त आणि अक्षय कुमारसह 20 हून अधिक स्टार्स असलेल्या 'वेलकम टू द जंगल' या कॉमेडी चित्रपटात दिसणार होता. दरम्यान आता या चित्रपटाबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. फिरोज नाडियादवालाच्या या चित्रपटापासून संजय दत्तनं स्वतःला दूर केलं आहे. 'वेलकम टू द जंगल'च्या टीझरमध्ये संजय दत्त दिसला होता. या टीझरमध्ये अनेक स्टार्स दिसले होते. रिपोर्ट्सनुसार, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक अहमद खान यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातून संजय दत्तनं माघार घेतली आहे. डेट शेड्यूलमुळे संजय दत्तनं या चित्रपटाला बाय बाय केलंय.

'वेलकम टू द जंगल' चित्रपटातून घेतला संजय दत्तनं माघार : 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचं शूटिंग कोणत्याही नियोजनाशिवाय केले जात आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये अनेकदा बदल करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी संजय दत्तनं 15 दिवस शूटिंग केले आहे. दरम्यान संजय दत्तच्या 15 दिवसांच्या शूटचे काय होणार याची चिंता निर्मात्यांना आता लागली आहे. निर्माते संजय दत्तच्या या शूटला कॅमियो रोलमध्ये रूपांतरित करण्याचा विचार करत आहेत. 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस,परेश रावल, दिशा पटानी, रवीना टंडन आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे.

संजय दत्तचे आगामी चित्रपट :'वेलकम टू द जंगल' 2024 च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे. हा चित्रपट जवळपास 400 कोटीच्या बजेटमध्ये तयार केला जात आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाकडून अक्षय कुमारला खूप अपेक्षा आहेत, कारण त्याचे यावर्षी रिलीज झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही फारशी जादू चालवू शकले नाही. आजकाल संजय दत्त साऊथ स्टार राम पोथीनेनी स्टारर चित्रपट 'आई-स्मार्ट'मुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील संजय दत्तचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटात तो 'बिग बुल'च्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो पुढं 'केडी - द डेव्हल' , 'हाऊसफुल्ल 5', या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. करण जोहरबरोबर काम करण्यासाठी टायगर श्रॉफ सज्ज, लवकरच आगामी चित्रपटाची घोषणा होणार - Tiger Shroff and KARAN JOHAR
  2. अभिनेता सलमान खाननं बजावला मतदानाचा हक्क; नदीम खान आणि सलमान खानची मतदान केंद्रावर झाली भेट - Lok Sabha Elections 2024
  3. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केलं 'हे' आवाहन - Ashok Saraf

ABOUT THE AUTHOR

...view details