महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'सिटाडेल' मालिकेमुळे सामंथा लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर - IMDB POPULAR INDIAN CELEBRITIES

'सिटाडेल: हनी बनी' मालिकेच्या लोकप्रियतेमुळे सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवनची वर्णी आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत लागली आहे. यात सामंथानं अव्वल स्थान पटकावलं आहे.

Samantha Ruth Prabhu and Varun Dhawan
सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन (ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 22, 2024, 5:17 PM IST

मुंबई - 'सिटाडेल: हनी बनी' या वेब सिरीजच्या प्रसारणानंतर यातील सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवनच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली आहे. या आठवड्यातील आयएमडीबी (IMDb )च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत 'सिटाडेल: हनी बनी' या सिरीजमधल्या कलाकारांचे नाव झळकत आहे. सामंथा रुथ प्रभू पहिल्या स्थानावर, तर वरुण धवन २५व्या स्थानावर आणि सिमरन ३६व्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

याशिवाय, 'भूल भुलैया ३' या चित्रपटाचे कलाकार देखील यादीत आपला दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. यातील भूमिकेमुळं तृप्ती डिमरी ५व्या स्थानावर, कार्तिक आर्यन १४व्या स्थानावर, दिग्दर्शक अनीस बज्मी १९व्या स्थानावर, तर विद्या बालन ३५व्या स्थानावर पोहोचले आहेत. 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटाच्या स्ट्रीमिंग रिलीजनंतर करीना कपूरनं १०वे स्थान पटकावले आहे. तसेच शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पदुकोण अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि नवव्या स्थानावर कायम राहात या लोकप्रिय कलाकारंच्या यादीत आपली उपस्थिती टिकवून ठेवली आहे.

आयएमडीबी ( IMDb ) अ‍ॅपवर (फक्त Android आणि iOS साठी उपलब्ध) लोकप्रिय इंडियन सेलिब्रिटी फीचर दर आठवड्याला भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना प्रकाशझोतात आणते. IMDb ला दरमहा २० कोटीहून अधिक लोक भेट देत असतात, यावरुनच ही यादी तयार केली जाते. यामुले मनोरंजन प्रेमी प्रेक्षकांना यामध्ये दर आठवड्याला कोणता सेलिब्रिटी ट्रेंडमध्ये आहे हे पाहता येतं, आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो करता येतं आणि नवोदित कलाकारांना ओळखण्याची संधीही मिळते.

प्रतिभावान कलाकारांना उंच शिखरावर पोहोचण्याचा मार्ग खुला करुन देण्याचं काम निर्माता दिग्दर्शक जोडी राज आणि डीके करत आले आहेत. यापूर्वी त्यांनी मनोज बाजपेयी यांना 'फॅमिली मॅन'मध्ये डिजिटल स्टार बनवले. त्यानंतर त्यांनी शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' या प्रसिद्धीचे भांडवल त्याच्या 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये वापरले. आणि, आता तो वरुण धवनची कारकीर्द वाचवण्याचा प्रयत्न या जोडीनं केला आहे. नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ हे दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांना रेड कारपेट टाकत आहेत. या दोघांची नवीन वेब सिरीज 'सिटाडेल हनी बनी' प्रसिद्ध झाल्यानंतर आता यातील आघाडीची जोडी सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन यांचा आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत समावेश झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details