महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान खानची दत्तक बहीण अर्पिता आणि आयुष शर्माच्या लग्नातला व्हिडिओ व्हायरल, पाहा स्टार्सचा मेळा - wedding video viral - WEDDING VIDEO VIRAL

Salman Khan : सलमान खानची दत्तक बहीण अर्पिता खानचं लग्न आयुष शर्माबरोबर मुंबईत झालं होतं. आता तिच्या लग्नाच्या 10 वर्षानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये अनेक नामांकित व्यक्ती लग्नाला उपस्थित होते असं दिसत आहे.

Salman Khan
सलमान खान (सलमान खान (IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2024, 6:06 PM IST

मुंबई Salman Khan : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खाननं दत्तक बहीण अर्पिता खान शर्माचं मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. अर्पिताचं 2014 मध्ये अभिनेता आयुष शर्माबरोबर लग्न झालं होतं. अर्पिता आणि आयुष शर्माच्या लग्नाला अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. त्याचबरोबर या लग्नातील मलायका अरोराचा सुंदर लूक देखील त्यावेळी चर्चेत होता. आता 10 वर्षांपूर्वी झालेल्या अर्पिता-आयुषच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. या जोडप्याच्या लग्नाचा हा व्हायरल व्हिडिओ अरबाज खानची पूर्वाश्रमीचा पत्नी मलायका अरोरापासून सुरू होतो. यानंतर अर्पिता आणि आयुष दिसतात.

सलमान खानची दत्तक बहीण अर्पिताच्या लग्नातील व्हिडिओ : पुढं मलायका तिचा मुलगा अरहान आणि बहीण अमृता अरोराबरोबर लग्नाचा आनंद लुटताना दिसते. यानंतर सलमान खानचे वडील सलीम खान त्यांची दुसरी पत्नी हेलनबरोबर दिसतात. याशिवाय या व्हिडिओत गोविंद, जरीन खान, आशा पारेख आणि वहिदा रहमान, सूरज पांचोली, दिलीप कुमार, सायरा बानो, तुषार कपूर, अजय देवगण, प्रेम चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, सोहेल खान, रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा दिसतात. अर्पिता आणि आयुषचं लग्न हे खूप भव्य करण्यात आलं होतं.

अर्पिता आणि आयुषला करतात यूजर्स ट्रोल :अर्पिताचं लग्न इतक भव्य होतं की, यामध्ये शाहरुख खानसह अंबानी कुटुंबीतील सदस्य, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, बोनी कपूर, श्रद्धा कपूर, दिया मिर्झा, झायेद खान पुलकित सम्राट, बॉबी देओलची पत्नी तान्या देओल, अनिल कपूर अनुपम खेर, गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया हे स्टार्स देखील हजेरी लावताना दिसतात. दरम्यान सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी लग्नात निळ्या रंगाच्या साडीत आपल्या सौदर्याचं प्रदर्शन करताना दिसते. अर्पिता आणि आयुषचं लग्न 18 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत झालं, हे लग्न खूप चर्चेत होतं. यावेळी अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या जोडीला यूजर्सनी खूप ट्रोल केलं होतं. आता देखील आयुषला अनेकजण त्याच्या लग्नासाठी ट्रोल करत असतात. अर्पिता अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

हेही वाचा :

  1. दुबई मॉलमध्ये सलमान खान हाय सिक्युरिटीसह झाला स्पॉट, व्हिडिओ व्हायरल - Salman Khan
  2. 'लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या', सलीम खान यांना धमकी दिल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Salim Khan Threat
  3. दिवाळीला डबल धमाल! दबंग सलमान खान रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये करणार कॅमिओ - Ajay Devgn

ABOUT THE AUTHOR

...view details