महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'सिकंदर'साठी सलमान खान स्वत:च करणार अ‍ॅक्शन सीन्स, 'या' दिवसापासून सुरू होणार शूटिंग - Salman Khan - SALMAN KHAN

Salman Khan : 'सिकंदर' चित्रपटामध्ये बॉडी डबल वापरण्याऐवजी सलमान खान स्वतःचे अ‍ॅक्शन सीन स्वतःच करणार आहे. 'सिकंदर'चे शूटिंग जूनमध्ये या तारखेपासून सुरू होत आहे.

Salman Khan
सलमान खान ((IMAGE- IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 5:20 PM IST

मुंबई - Salman Khan : सलमान खान दरवर्षी ईदला त्याच्या चाहत्यांना त्याच्या धमाकेदार चित्रपटाची भेट देत असतो. यंदाच्या ईदला सलमान खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही, मात्र ईदच्या मुहूर्तावर सलमाननं चाहत्यांना नवीन चित्रपटाची भेट नक्कीच जाहीर केली. आमिर खानबरोबर 'गजनी' हा सुपरहिट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक एआर मुरुगोदास यांच्याबरोबर सलमान खानने सिकंदर या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमान खान त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट सिकंदरने बॉक्स ऑफिसवर धमाका करण्याच्या तयारीत आहे. इकडे सलमान खानचा हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असून त्याची तयारी आता सुरू झाली आहे. या चित्रपटात सलमान खान स्वतःचे अ‍ॅक्शन सीन्स करणार असल्याचे बोलले जात आहे.

सिकंदरचे शूटिंग मुंबईतून सुरू होणार असून या चित्रपटाचे अनेक ठिकाणी शूटिंग होणार आहे. यासाठी सिकंदरची टीम अनेक ठिकाणी भेट देणार असून चालू मे महिन्याच्या शेवटी सलमान खानचे फोटोशूट होणार आहे आणि त्यानंतर २० जूनपासून चित्रपटाचं प्रत्यक्ष काम सुरू होईल. सध्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन स्टेजवर काम सुरू आहे. सलमान खान सिकंदर या चित्रपटात स्वतःचे अ‍ॅक्शन सीन्स बॉडी डबल न वापरता करणार आहे. यासाठी सलमान खान पूर्ण प्रशिक्षण घेण्याची तयारी करत आहे.

सिकंदर हा चित्रपट सलमान खानच्या करिअरमध्ये मोठे वळण आणू शकतो. अशा परिस्थितीत हा पॅन इंडिया चित्रपट बनवताना निर्मात्यांना कोणतीही तडजोड करायची नाही. मागील अनेक चित्रपटांमुळे सलमान बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकलेला नाही. अशा परिस्थितीत चित्रपट 1000 कोटींचा गल्ला जमवण्यासाठी निर्माते दिवसरात्र मेहनत करत आहेत.

यासाठी सलमान खान मोठ्या प्रमाणावर जिम करत आहे. भाईजानने त्याच्या कामाचा दिनक्रम बदलला आहे. चित्रपटाची मुख्य नायिका रश्मिका मंदान्ना हिलाही कठोर परिश्रम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास आणि हिंदी भाषेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं गेलं आहे. कारण 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिकात सुमार दर्जाच्या हिंदीमुळे खूप ट्रोल करण्यात आले होते.

चित्रपटाचं शूटिंग मुंबईमार्गे हैदराबादला पोहोचणार असून 'सिकंदर' चित्रपटाची संपूर्ण टीम परदेशात रवाना होणार आहे. हा चित्रपट 2025 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. 2025 मध्ये 31 मार्च महिन्यात ईद असेल.

हेही वाचा -

  1. कमल हासन स्टारर 'इंडियन 2' ऑडिओ लॉन्चची जय्यत तयारी सुरू, राम चरण- रणवीर सिंगसह दिग्गज स्टार्स लावणार हजेरी - Kamal Haasan
  2. या आठवड्यातील ओटीटीवरील आकर्षणं : पंचायत - 3, क्रू, द गोट लाइफसह भरपूर मनोरंजनाची पर्वणी - OTT Watchlist for This Week
  3. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडींचा नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारानं होणार सन्मान - Ashok Saraf and Rohini Hattangadi

ABOUT THE AUTHOR

...view details