महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'लॉरेन्स बिश्नोईला मला आणि माझ्या कुटुंबाला मारायचं होतं', सलमान खाननं केलं विधान... - SALMAN KHAN and Bishnoi Gang - SALMAN KHAN AND BISHNOI GANG

Salman khan: घरावर गोळीबार प्रकरणात सलमान खानचं वक्तव्य समोर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅगनं केलेल्या हल्ल्यामुळे तो आणि त्याचं कुटुंब घाबरले असल्याचं त्यानं म्हटलंय.

Salman khan
सलमान खान (सलमान खान (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 12:06 PM IST

मुंबई - Salman khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. यावर्षी 14 एप्रिल रोजी पहाटे 4 च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भाईजानच्या घरावर गोळीबार केला. तेव्हापासून मुंबई पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. अनेकदा सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. गुन्हे शाखेनं काही आरोपीला अटक केली होती. या प्रकरणाचे धागेदोरे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी जुळले गेले आहेत. तसंच सलमानचं या प्रकरणी जबाबही नोंदवलं गेलं होतं. आता सलमाननं काय सांगितलं याबद्दल जाणून घेऊया...

कुटुंबाला जीवे मारण्याच्या उद्देश :मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हटलं की, "लॉरेन्स बिश्नोईनं, मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्यासाठी घराबाहेर गोळ्या झाडल्या होत्या." 4 जून रोजी सलमान खाननं मुंबई क्राइम ब्रँचच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलकडे आपले जबाब नोंदवले होतं. सलमाननं आपल्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की, "मी एक फिल्मस्टार आहे आणि गेल्या 35 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे, माझे घर वांद्रे येथे असून मी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, जिथे अनेकदा माझ्या चाहत्यांची गर्दी जमते. मी त्यांना भेटण्यासाठी गॅलेक्सी बाल्कनीमध्ये येत असतो. जेव्हा माझ्या घरी पार्टी असते, तेव्हा मी माझे मित्र आणि वडिलांबरोबर बाल्कनीत अनेकदा बसत असतो. बाल्कनी मी ताजी हवा घेण्यासाठी जातो, मी माझ्यासाठी खाजगी सुरक्षा देखील ठेवली आहे."

लॉरेन्स बिश्नोईचा हल्ला :यानंतर सलमाननं पुढं सांगितलं, "2022 रोजी माझ्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. माझ्या वडिलांना एक पत्र मिळालं होतं. या पत्रामध्ये माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती, हे पत्र माझ्या अपार्टमेंटमध्ये पडलेलं होतं. यानंतर माझ्या अधिकृत ईमेल आयडीवर एक मेल आला. यामध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला लॉरेन्स बिश्नोई यांनी धमकी दिली होती. जानेवारी 2023 मध्ये माझ्या पनवेल फार्महाऊसमध्ये दोन जणांनी नावे बदलून घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्या दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मला नंतर कळले की ते दोघेही गुन्हेगार राजस्थानच्या फाजिल्का गावातील आहेत." यानंतर त्यानं पुढं सांगितलं की, "14 एप्रिल 2024 रोजी, मी माझ्या खोलीत झोपलो होतो, तेव्हा मला फटाक्यांचा आवाज आला. पहाटे 4.55 वाजले होते, तेव्हा माझ्या अंगरक्षकानं मला सांगितलं की, बाईकवरून आलेल्या दोघांनी पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीवर गोळीबार केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोईनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं मला समजलं, मला खात्री आहे, की लॉरेन्सच्या टोळीनं हे केलं आहे. माझ्या जीवावर झालेल्या हल्ल्याबाबत माझ्या अंगरक्षकानं 14 एप्रिल रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याआधी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीनं एका मुलाखतीत मला आणि माझ्या कुटुंबाला मारणार असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईनं त्याच्या टोळीच्या सदस्यांच्या मदतीनं हे केलंय असं मला वाटतं, गोळीबार करताना माझे कुटुंब झोपलेलं होतं." या वक्तव्यावर सलमान खाननंही स्वाक्षरी केली आहे.

हेही वाचा :

  1. त्रिशा कृष्णन 14 वर्षांनंतर सलमान खानबरोबर 'द बुल'मधून बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक - Trisha Krishnan News
  2. सलमान खान आणि शाहरुख खान यांनी अनंत - राधिकाच्या लग्नात नीता अंबानीबरोबर केला डान्स - Salman Khan and Shah Rukh Khan
  3. सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल; 'लॉरेन्स'बाबत पोलिसांचा मोठा दावा - Salman Khan House Firing Incident

ABOUT THE AUTHOR

...view details