मुंबई - Anant Ambani, Radhika Merchant wedding :अंबानी कुटुंबाचा लाडका मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या लग्नाला अवघे 3 दिवस उरले आहेत. दरम्यान बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, रणवीर सिंग, सारा अली खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोमवारी 8 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदी समारंभाला हजेरी लावली होती. या हळदी समारंभामधील बॉलिवूड स्टार्स स्टाईलिश अंदाजात दिसले. या जोडप्याच्या हळदी समारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ग्रँड हळदीचा कार्यक्रम : हळदीच्या कार्यक्रमात रणवीर सिंग डोक्यापासून ते पायापर्यंत पिवळा रंगलेला दिसत आहे. त्याचा चेहराही हळदीनं पिवळा झाला होता. हा ग्रँड हळदी कार्यक्रम अंबानींच्या अँटिलियामध्ये आयोजित करण्यात आला होता. सलमान खानही या कार्यक्रमात हळद खेळताना दिसला. याशिवाय अंबानी कुटुंबातील सदस्यही हळदीच्या पिवळ्या रंगात रंगलेले दिसले. मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी हे देखील अँटिलियाच्या बाहेर जाताना दिसले. यावेळी टीना अंबानी देखील पिवळ्या रंगाच्या पोशाखात होती आणि तिच्या चेहऱ्यावर भरपूर हळद लावलेली होती. तिनं पापाराझींना फोटोसाठी पोझही दिली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा हळदीचा समारंभ :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदी समारंभात सलमान खान नेव्ही ब्लू ड्रेसमध्ये पोहोचला होता. यानंतर तो घराच्या बाहेर आल्यानंतर केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसला. हळदीच्या कार्यक्रमात घरी जात असताना सलमाननं अँटिलियाच्या बाहेर उभे असलेल्या पापाराझींना फोटोसाठी पोझ दिली. सलमान खान आणि रणवीर सिंग व्यतिरिक्त या कार्यक्रमात मुकेश अंबानींची बहीण दीप्ती साळगावकर, भाऊ अनिल अंबानी-टीना अंबानी हे देखील दिसले. सारा अली खान, अनन्या पांडे, 'जवान' डायरेक्टर ॲटली, जान्हवी कपूर, शिखर पहाडियासह अनेक स्टार्सनं कॅमेऱ्या समोर फोटोसाठी पोझ दिली.