महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Salman Khan : सलमान खाननं चाहत्यांना रमजानच्या दिवशी दिली अनोखी भेट - Salman Khan giftes fans on Ramzan

Salman Khan : रमजान सुरू होताच, सलमान खाननं नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट ईद 2025 ला प्रदर्शित होणार आहे.

Salman Khan
सलमान खान

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 5:05 PM IST

मुंबई - Salman Khan : सलमान खाननं 'गजनी' या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. आज 12 मार्चपासून रमजान महिना सुरू झाला आहे. सलमान खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून रमजानचा पहिला दिवस खास बनवला. सलमान दिग्दर्शक ए.आर.मुरुगादासबरोबर पहिल्यांदाच काम करणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे. सलमान खाननं आज 12 मार्च रोजी त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये निर्माता साजिद नाडियाडवाला आणि साऊथ चित्रपटांचे ए.आर.मुरुगादास यांना टॅग करून नवीन चित्रपटाची घोषणा करत लिहिलं, ''दिग्दर्शक ए.आर. मुरुगादास आणि साजिद नाडियादवाला यांच्या एका रोमांचक चित्रपटाशी निगडीत असल्याचा आनंद मला झाला आहे. या प्रवासासाठी मी तुम्हा सर्वांचे प्रेम मागतो. हा चित्रपट 2025 च्या ईदला प्रदर्शित होईल.''

सलमान खानचा आगमी चित्रपट : रमजानच्या मुहूर्तावर एवढी मोठी भेट मिळाल्यानं सलमान खानचे चाहते आता आनंदित झाले आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं की, ''वर्ष 2025 भाईजानच्या नावावर आहे'. दुसऱ्या एकानं लिहिले , ''अभिनंदन भाईजान.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं की, ''हॅप्पी रमजान, भाईजान.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

सलमान खान वर्कफ्रंट :सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'टायगर 3' या चित्रपटामध्ये दिसला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. सलमान व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये कतरिना कैफ, इमरान हाशमी, शाहरुख खान, रिद्धी डोगरा, आशुतोष राणा, साऊथ अभिनेत्री रेवती आणि इतर कलाकार दिसले होते. सलमानचा हा चित्रपट त्याच्या चाहत्यांना खूप पसंत पडला होता. याशिवाय तो आगामी 'द बुल ' किक २', 'टायगर वर्सेस पठाण', 'दबंग 4' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. आयुष शर्मा अभिनीत 'रुस्लान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ; पाहा व्हिडिओ
  2. Krystyna Pyszkova : मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्कोव्हाला 'या'मुळे आवडतो शाहरुख खान
  3. सनी देओल स्टारर 'द हिरो'चे निर्माते धीरजलाल शाह यांचं अवयव निकामी झाल्यानं निधन

ABOUT THE AUTHOR

...view details