मुंबई -Tiger 3 World Tv Premiere :अभिनेता सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर सुपरहिट चित्रपट आता अनेकांना घरी बसून पाहता येणार आहे. चित्रपटगृहांमध्ये 12 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेला 'टायगर 3'चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर स्टार गोल्डवर होणार आहे. स्टार प्लसच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, 'टायगर 3'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 16 आणि 17 मार्च रोजी स्टार गोल्डवर होईल. आता या चित्रपटाबाबत ही अपडेट शेअर करताना सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर लिहिलं, ''टायगर आणि झोया नवीन मिशन पूर्ण करण्यासाठी तयार आहेत... तुम्ही तयार आहात का? 'टायगर 3'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शनिवार 16 मार्च रोजी रात्री 8 वाजता आणि रविवार 17 मार्च दुपारी 12 वाजता फक्त स्टार गोल्डवर पाहा.''
'टायगर 3'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर :सलमान खाननं शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. भाईजानचे काही चाहते या पोस्टवर कमेंट्स करून हा चित्रपट नक्की पाहू असल्याचं म्हणत आहेत. 'टायगर 3'चं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलंय. या चित्रपटाचं बजेट 300 कोटी रुपये असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. जगभरात या चित्रपटानं 466.63 कोटींची कमाई केली होती. 'टायगर 3' हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचा निर्माता आदित्य चोप्रा आहे. या चित्रपटाला यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आलं आहे.