महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"तुमचं आमच्यावरील सततचं निरीक्षण आणि देखरेख आम्हाला...", पती सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीनाची पोस्ट - SAIF ALI KHAN ATTACKED NEWS

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूरनं मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित करीना कपूरनं काय आवाहन केलं? वाचा सविस्तर बातमी.

saif Ali Khan attacked news updates
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीनाची पोस्ट (Source- IANS)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2025, 7:28 AM IST

मुंबई- गुरुवारी पहाटे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर खाननं सोशल मीडियावर भावना व्यक्त केली आहे. करीनानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माध्यमांना कोणत्याही प्रकारच्या अंदाजापासून दूर राहण्याची विनंती केली आहे.

करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं, "आमच्या कुटुंबासाठी हा अविश्वसनीय आणि आव्हानात्मक दिवस होता. समोर घडलेल्या घटना अजूनही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठीण काळातून जात असताना सर्वांनी सहकार्य दाखविल्याबद्दल आभारी आहोत. कठीण काळातून जात असताना मीडिया आणि पापाराझी यांनी सतत कव्हरेज आणि अंदाजापासून दूर राहावं, अशी नम्र विनंती आहे."

पुढे करीनानं म्हटलं, " तुम्ही आमच्यासाठी दाखवीत असलेली काळजी आणि पाठिंबा, यासाठी आम्ही आभारी आहोत. परंतु हे तुमचं आमच्यावरील सततचं निरीक्षण आणि देखरेख आम्हाला मानसिकदृष्ट्या थकविते. त्याचबरोबर आमच्या सुरक्षिततेसाठीदेखील मोठा धोका निर्माण करत आहे. कृपया आमच्या मर्यादांचा आदर करत आम्हाला सावरण्यासाठी काही वेळ द्यावा. या संवेदनशील काळात तुम्ही दाखवित असलेल्या समजुतदारपणा आणि सहकार्याबद्दल मी आगाऊ आभार मानते."

मुंबई पोलिसांच्या २० पथकांकडून शोध सुरू-गुरुवारी मध्यरात्री घरात घुसलेल्या एका चोरानं अभिनेतासैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात चाकूनं वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. अभिनेत्याच्या टीमच्या माहितीनुसार त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरात घुसलेल्या चोरांनी सैफ अली खानकडं १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. केअरटेकरनं दिलेल्या माहितीनुसार सैफवर चाकुनं वार करणारा आरोपी हा सुमारे ३५ ते ४० वर्षांचा आहे. आरोपीच्या डोक्यावर टोपी होती. हा आरोपी इमारतीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजचा वापर करत मुंबई पोलिसांच्या २० पथकांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • अभिनेता सैफवरील हल्ल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. सेलिब्रिटीच सुरक्षित राहत नसल्यानं मुंबई ही सुरक्षित राहीली नसल्याचा विरोधकांनी गुरुवारी आरोप केला होता. तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई सुरक्षित असल्याचा दावा केला.

हेही वाचा-

ABOUT THE AUTHOR

...view details