महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सचिन पिळगावकर स्टारर 'नवरा माझा नवसाचा 2'चे शूटिंग झालं सुरू - सचिन पिळगावकर

Navra Mazha Navsacha 2 : सचिन पिळगावकर अभिनीत 'नवरा माझा नवसाचा 2'चे शुटिंग 5 फेब्रुवारीपासून सुरू झालं आहे. या चित्रपटाची प्रतिक्षा सचिनच्या चाहत्यांकडून सुरू झाली आहे.

Navra Mazha Navsacha 2
नवरा माझा नवसाचा 2

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Navra Mazha Navsacha 2 : अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक सचिन पिळगावकर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आजवर सचिननं त्याच्या प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलंय. आता सचिन 'नवरा माझा नवसाचा' पार्ट 2 घेऊन येत आहे. 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंतीस उतरला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता 'नवरा माझा नवसाचा' सीक्वल येत आहे, तर अनेकजण या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेन वाट पाहात आहेत. 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

'नवरा माझा नवसाचा 2' लवकरच येणार चित्रपटगृहात : सचिन पिळगावकरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "सरप्राईज, 19 वर्षांनंतर येत आहे ‘नवरा माझा नवसाचा 2' गणपती बाप्पा मोरया! शूटिंगला सुरुवात झाली आहे." आता सचिनच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काहीजण यावर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. 'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, अशोक सराफ, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, अली असगर, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव वैभव मांगले, हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाबद्दल : सचिन पिळगावकर स्टारर 'नवरा माझा नवसाचा' चित्रपट 2005मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट खूप मजेदार होता, याशिवाय चित्रपटामधील गाणं देखील प्रचंड प्रसिद्ध झाली होती. 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटामध्ये सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर व्यतिरिक्त अशोक सराफ, विजय पाटकर, रीमा लागू, कुलदीप पवार, जॉनी लिव्हर, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, मधुराणी गोखले, प्रदीप पटवर्धन, विकास समुद्रे, सुनिल तावडे, वैभव मांगले, अली असगर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, सतिश तारे असे अनेक कलाकार होते. या चित्रपटाची कहाणी एका नवसावर आधारित होती.

हेही वाचा :

  1. 'फायटर'नं जगभरात 300 कोटीचा टप्पा केला पार
  2. ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा 'शक्ती' बँड काय आहे, जाणून घ्या इतिहास
  3. ए .आर. रहमान यांनी केले ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

ABOUT THE AUTHOR

...view details