महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'देवरा -1' च्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला एसएस राजामौली आणि अनिरुद्ध रविचंदरची हजेरी, व्हिडिओ व्हायरल - Devara first day first show - DEVARA FIRST DAY FIRST SHOW

SS Rajamouli-Anirudh for Devara: 'देवरा' चित्रपटाचा पहिला भाग पाहण्यासाठी दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी पहिल्या दिवशी पहिल्या शोला हजेरी लावली. दोघांचेही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

SS Rajamouli and Anirudh Ravichander
एसएस राजामौली-अनिरुद्ध रविचंदर (एसएस राजामौली-अनिरुद्ध रविचंदर (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 12:44 PM IST

हैदराबाद - 'देवरा : पार्ट 1' आज 27 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी ज्यूनियर एनटीआरचे चाहते मोठ्या संख्येने थिएटरमध्ये पोहोचले होते. दरम्यान, आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली देखील फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी कुटुंबासह थिएटरमध्ये हजर होते. राजामौली यांनी ज्युनियर एनटीआरच्या देवरा चित्रपटाचा आपल्या कुटुंबासह आनंद लुटला. आता राजामौली यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एसएस राजामौली आपल्या कुटुंबासह 'देवरा' चित्रपटाचा शो पाहण्यासाठी पोहोचले. एका पापाराझीने आपल्या इंस्टाग्रामवर एसएस राजामौलीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये राजामौली यांची माहिती देताना त्याने लिहिले आहे की, 'दिग्गज भारतीय दिग्दर्शक एसएस राजामौली पहिल्याच दिवशी 'देवरा'चा पहिला शो पाहण्यासाठी हैदराबादमध्ये पोहोचले.'

व्हिडीओच्या सुरुवातीला दिग्दर्शक एसएस राजामौली थिएटरमध्ये दिसतात. तेथे उपस्थित श्रोत्यांचे त्यांनी हस्तांदोलन करून अभिवादन केले. यानंतर दिग्दर्शकाची एंट्री थिएटरमध्ये दाखवण्यात आली आहे. जूनियर एनटीआरचा चित्रपट पाहण्यासाठी राजामौली पत्नी आणि मुलांसह थिएटरमध्ये पोहोचले होते.

राजामौलीचा व्हिडिओ शेअर करताना एका युजरनं लिहिले की, 'दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी हैदराबादमधील 'देवरा' शोचा आनंद लुटला.' एका युजरनं त्यांच्या कुटुंबासह इन्टरव्हलमध्ये आराम करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

दुसरीकडे, 'देवरा'च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये अनिरुद्ध चेन्नईच्या प्रसिद्ध थिएटर वेत्रीमध्ये प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. दरम्यान, चित्रपटातील एक गाणे गाऊन तो थिएटरमध्ये संपूर्ण चैतन्याचं वातावरण तयार करतो. त्याच्याबरोबर तिथं उपस्थित असलेले प्रेक्षकही जल्लोष करताना दिसत आहेत. गायकाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

'देवरा : भाग 1' खूप धूमधडाक्यात रिलीज झाला आहे. हा ज्युनियर एनटीआरचा सहा वर्षांतील पहिला सोलो चित्रपट आहे. या चित्रपटाची आतापर्यंत 80 कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. पहिल्या दिवशी हा चित्रपट जगभरात १०० कोटींचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा -

  1. 'देवरा: पार्ट 1'च्या रिलीजच्या जल्लोषात ज्युनियर एनटीआरच्या कट-आउटला लागली आग, देवदूतानं दाखवला समजदारपणा - Devara Part 1
  2. 'देवरा पार्ट 1'चं रिलीज सेलिब्रेशन झालं भव्य, प्रेक्षकांनी दिली चित्रपटाला पसंती - jr ntr movie
  3. विजय देवराकोंडानं रिलीजपूर्वी 'देवरा: पार्ट 1'साठी दिला 'हा' संदेश, पोस्ट व्हायरल - VIJAY DEVERAKONDA

ABOUT THE AUTHOR

...view details