मुंबई - Sushmita Sen :अभिनेत्री सुष्मिता सेन अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 23 डिसेंबर रोजी सुष्मितानं बॉयफ्रेंड रोहमन शॉलपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. आता दोघांचं पुन्हा एकदा पॅचअप झालंय. काल रात्री सुष्मिता तिच्या बॉयफ्रेंडबरोबर एका अवॉर्ड फंक्शनमधून बाहेर पडताना दिसली. यावेळी रोहमन शॉलचं सुष्मितावरचं प्रेम पाहून सर्वांनी त्याचं कौतुक केलंय. सध्या सोशल मीडियावर दोघांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये सुष्मिता सेनला तिथं उपस्थित असलेल्या चाहत्यांच्या गर्दीपासून रोहमन शॉलनं वाचवलं आणि तिला कारमध्ये सुरक्षित बसवलं.
सुष्मिता सेनला गर्दीपासून बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं वाचवलं, व्हिडिओ व्हायरल - Sushmita Sen - SUSHMITA SEN
Sushmita Sen : एका अवॉर्ड फंक्शनमधून बाहेर पडताना सुष्मिता सेनला पाहण्यासाठी अनेक चाहते जमले होते. आता या गर्दीपासून सुष्मिताला वाचविण्यासाठी बॉयफ्रेंड रोहमन शॉल तिचा अंगरक्षक बनला.
![सुष्मिता सेनला गर्दीपासून बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं वाचवलं, व्हिडिओ व्हायरल - Sushmita Sen Sushmita Sen](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-07-2024/1200-675-21999382-thumbnail-16x9-sushmita-sen.jpg)
Published : Jul 20, 2024, 10:50 AM IST
रोहमन आणि सुष्मिताचा व्हिडिओ व्हायरल :व्हिडिओत रोहमन हा सुष्मिताला सेल्फी काढणाऱ्या चाहत्यापासून वाचवतानाही दिसला. सुष्मिता इव्हेंटमधून बाहेर पडताच तिथे उपस्थित असलेले चाहते आणि पापाराझी तिला पाहून आवाज देऊ लागले. अनेक चाहते तिला सेल्फी काढण्याची विनंती करताना दिसले. सुष्मिता आणि रोहमनला पुन्हा एकत्र पाहून चाहते आता खुश झाले होते. या जोडप्याचं पॅचअप झाल्यानंतर चाहते या व्हिडिओ पोस्टवर कमेंट करून आनंद व्यक्त करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलं, "एकत्र दोघेही खूप सुंदर दिसतात." आणखी एकानं लिहिलं, "आता नेहमीसाठी एकत्र राहा" दुसऱ्यानं लिहिलं, "दोघांची जोडी खूप सुंदर आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
सुष्मिता सेनचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांचं नातं आणि ब्रेकअप कोणापासूनही लपलेलं नाही. सुष्मिता आणि रोहमनची भेट 2018 मध्ये झाली होती. त्यानंतरच दोघांनी डेट करायला सुरुवात केली होती. तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'आर्य 3' मध्ये दिसली होती. याशिवाय तिनं रिया चक्रवर्तीच्या चॅट शो 'चॅप्टर-2'मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिनं आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या.