मुंबई - Riteish Deshmukh web series Pill : अभिनेता रितेश देशमुख लवकरच 'पिल' नावाच्या नवीन वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. आज शनिवारी मालिकेच्या निर्मात्यांनी शोच्या मोशन पोस्टरचं लॉन्चिंग केलं. औषध उद्योगातील अंधकारमय आणि भ्रष्ट जगाविरुद्ध लढाईचं बिगुल फुंकण्याचं काम ही मालिका करणार आहे. याची झलक या मोशन पोस्टरमध्ये दिसून येते.
'पिल' या वेब सिरीजची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी मूव्हीजने केली आहे आणि ही मालिका राज कुमार गुप्ता यांनी तयार केली आहे. 12 जुलै रोजी जिओ सिनेमावर ही मालिका प्रदर्शित होणार आहे. रितेश देशमुख व्यतिरिक्त इतर कलाकार कोण असतील याचा उलगडा अद्याप करण्यात आलेला नाही.
'पिल' च्या मोशन पोस्टरमध्ये रितेश देशमुख एका गंभीर विषयावर संवाद साधताना दिसतोय. त्याच्या हातामध्ये एक औषधाची कॅप्सुल दिसत असून हिंदी भाषेतील व्हाईस ओव्हरमध्ये तो म्हणतो, "इस देश में कौन से बिमारी से कितने लोग मरते है, इसका डाटा है हमारे पास, लेकीन खराब दवाई की वजह से कितने लोगों का जान जा रहा है, इसका कोई डेटा नही है."
भारतासारख्या देशामध्ये औषध उद्योग खूप विस्तारित झालेला आहे. शेकडो कंपन्या प्रचलित आजारावरील औषधांची निर्मिती करतात. तर नव्या आजारांच्या औषधांवर संशोधनही करत असतात. यातून वैद्यकिय क्षेत्राला लाभ होत असला तरी काही कंपन्या केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून काही घातक औषधांचीही निर्मिती करत असतात. याचा दूरगामी परिणाम रुग्णांवर होत असतो. चुकीची किंवा घातक औषधामुळे बळी गेल्याच्याही अनेक घटना देशात घडल्या आहेत. अशा घटनांवर आधारित औषध कंपन्यांची पोलखोल या वेब मालिकेतून होईल असंच प्रथमदर्शनी दिसतंय.
हेही वाचा -
- महाराज X रिव्ह्यू : जुनैद खाननं पदार्पणातच जिंकली प्रेक्षकांची मनं, जयदीप अहलावतच्या कामावर नेटिझन्स फिदा - Maharaj X Review
- अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह जोगेश्वरीतून अटक - Theft at Anupam Kher office
- सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो आले समोर - Sonakshi Sinha Wedding