महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांनी मित्रमंडळीबरोबर 'तांबडी चामडी' गाण्यावर केला जोरदार डान्स - RITEISH DESHMUKH

रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये हे जोडपे आपल्या मित्रमंडळीबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

riteish deshmukh and genelia dsouza
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा (जेनेलिया आणि रितेश देशमुख (फाईल फोटो) (ANI)))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 25, 2024, 10:44 AM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा हे जोडपे चाहत्यांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता गेल्या काही दिवसांपासून 'तांबडी चामडी' या गाण्याची सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ-मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी या ट्रेडिंग गाण्यावर आपला खास व्हिडिओ बनवला आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रितेश जेनेलियासह त्यांचे मित्रमंडळी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या गाण्यांची भुरळ या जोडप्यांना आता लागल्याची दिसत आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल :रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा या दोघांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 'तांबडी चामडी' गाण्यावरचा त्यांचा हा रिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांना आवडत आहे. त्याच्या रिलच्या पोस्टवर अनेकजण भरभरून कमेंट्स देत त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. 'तांबडी चामडी' हे गाणं 'मराठी वाजलंच पाहिजे' म्हणणारा लोकप्रिय डीजे क्रेटेक्स म्हणजेच मराठमोळ्या कृणाल घोरपडेनं संगीतबद्ध केलंय. क्रेटेक्सचे गाणी ही खूप जास्त लोकांना आवडतात. अनेकजण आता 'तांबडी चामडी' या गाण्यावर रिल्स बनवत असून याला आणखीच लोकप्रिय करत आहे.

'तांबडी चामडी' गाण्यावर कुठल्या स्टार्सनं केली धमाल : रितेश आणि जेनेलिया यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या मित्रमंडळींबरोबर 'चिकनी चमेली' या गाण्यावर डान्स केला होता. त्यांचा हा व्हिडिओ देखील चाहत्यांना आवडला होता. यावर देखील अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान 'तांबडी चामडी' गाण्यावर रितेश आणि जेनेलियासह शब्बीर अहलूवालिया, जेनिफर विगेंट, कांची कौल, आशिष चौधरी, मुश्ताक शेख, समिता बंगार्गी यांनी धमाकेदार डान्स केला आहे. रितेशनं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमच्या गँगबरोबर लका लका.' या व्हायरल व्हिडिओमध्ये सर्व स्टार्सची तुफान एनर्जी पाहायला मिळत आहे. दरम्यान रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'मस्ती 4', 'राजा शिवाजी', 'हाऊसफुल्ल 5' आणि 'रेड 2'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. बिग बॉस मराठीत कोण ठरणार विजयी? ग्रँड फिनालेच्या रंगतदार सोहळ्यात आज होणार घोषणा - Bigg Boss Marathi
  2. रितेश देशमुख 'भाऊचा धक्का', निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्याबद्दल आर्या जाधवला फटकारलं - riteish deshmukh
  3. 'तुझे मेरी कसम' होणार 'या' दिवशी रुपेरी पडद्यावर पुन्हा प्रदर्शित, जाणून घ्या तारीख - Riteish Deshmukh

ABOUT THE AUTHOR

...view details