मुंबई :अभिनेता रणवीर सिंग 2024 च्या दिवाळीला रिलीज झालेल्या अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसला होता. 2024 मध्ये त्याचा मुख्य भूमिका असलेला एकही चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेला नाही. 8 सप्टेंबर 2024 मध्ये वडील झाल्यानंतर, त्यानं आता त्याच्या आगामी 'धुरंधर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 'धुरंधर'च्या सेटवरून रणवीरच्या लूकचे काही फोटो लीक झाले आहेत. सोशल मीडियावर 'धुरंधर'च्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये रणवीर हा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. लीक झालेल्या फोटोमध्ये रणवीर हा पंजाबी लूकमध्ये दिसत आहे.
रणवीर सिंगच्या आगामी चित्रपट 'धुरंधर'मधील लूक लीक : रणवीर सूट-बूटसह गुलाबी पगडी घातल्याचं एका व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसत आहे. पहिल्यांदाच रणवीर हा पडद्यावर पगडी घालून प्रेक्षकांना दिसेल. याशिवाय व्हायरल झालेल्या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर काही जखमाही दिसत आहेत. तसेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्याची दाढी वाढलेली, केस लांब आणि हातात सिगारेट असल्याची दिसत आहे. यात तो माफिया लूकमध्ये आहे. 23 सेकंदाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीर हा एका मुलाचे अपहरण करून त्याला आपल्या कारमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. आता त्याच्या या व्हिडिओवर त्याचे अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.