महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Orry share video: रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरनं अंबानीच्या प्री-वेडिंग पार्टीत ओरीची उडवली खिल्ली - Orry share video

Orry share video : मीडिया सेन्सेशन 'ओरी' हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमध्ये सहभागी झाला होता. आता या कार्यक्रमामधील एक व्हिडिओ ओरीनं शेअर केला आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर त्याच्याबरोबर दिसत आहेत.

Orry share video
ओरीनं शेअर केला व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 4:59 PM IST

मुंबई -Orry share video: ओरहान अवत्रामणी उर्फ ओरी नवनवीन कारणामुळे चर्चेत असतो. तो कधी त्यांच्या फॅशनमुळे तर कधी सेलिब्रिटींबरोबर ग्लॅमरस फोटोंमुळे सर्वांचं लक्ष नेहमीच वेधून घेत असतो. अलीकडेच तो जामनगर, गुजरात येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री- वेडिंगच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. या कार्यक्रमात बी-टाउनमधल्या प्रसिद्ध व्यक्तीही सहभागी झाल्या. आज 12 मार्च रोजी ओरीनं या कार्यक्रमामधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरबरोबर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिघेही मस्ती करताना दिसत आहेत.

ओरीनं शेअर केला व्हिडिओ :याशिवाय रणबीर या व्हिडिओमध्ये ओरीच्या टचबद्दलही सांगिताना दिसत आहे. दरम्यान ओरीनं या मजेदार व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''रणवीर सिंगनं टचसह फोटो क्लिक करण्यामागील कारण उघड केलं. मी गंमत करतोय.'' व्हिडिओमध्ये ओरी रणवीरला त्याच्याबद्दल स्टेटमेंट देण्याची विनंती करताना दिसत आहे. कॅमेरा समोर येताच रणवीर आणि अर्जुन 'सायन्स ऑफ ओरी'बद्दल बोलताना दिसत आहेत. याशिवाय व्हिडिओमध्ये दोघंही ओरीची खिल्ली उडवताना दिसत आहेत. अर्जुननं रणवीरला किडनी आणि ओरीला लीव्हर म्हटलं आहे. रणवीर व्हिडिओत ओरीची सिग्नेचर पोझ देताना दिसत आहे. ओरी स्वतः त्याच्या स्पर्शाच्या स्कोअरिंगचे देखील स्पष्टीकरण देताना दिसत आहे.

ओरीचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स मित्र :ओरहानचं टोपणनाव 'ओरी' आहे. सगळे त्याला प्रेमानं ओरी म्हणतात. ओरहानला पार्ट्यांचा शौक आहे आणि तो स्टार्सबरोबर मोठ्या पार्ट्यांमध्ये दिसतो. ओरहान अनेकदा त्याच्या इन्स्टा हँडलवर बॉलिवूड स्टार्स फोटो शेअर करत असतो. ओरीचे बॉलीवूड सेलिब्रिटी आणि स्टार किड्स यांच्याशी खूप जवळचे नाते आहे. ओरहानचे नाव जान्हवी कपूरसोबत जोडले गेले होते. आजकाल ओरी न्यासा देवगनबरोबर अनेकदा दिसतो. याशिवाय ओरी 'बिग बॉस सीजन 17'मध्ये आला होता. इथे देखील ओरी 'बिग बॉस'मधील स्पर्धकांबरोबर मस्ती करताना दिसला होता. याशिवाय त्यानं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं.

हेही वाचा :

  1. आयुष शर्मा अभिनीत 'रुस्लान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ; पाहा व्हिडिओ
  2. Krystyna Pyszkova : मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्कोव्हाला 'या'मुळे आवडतो शाहरुख खान
  3. सनी देओल स्टारर 'द हिरो'चे निर्माते धीरजलाल शाह यांचं अवयव निकामी झाल्यानं निधन

ABOUT THE AUTHOR

...view details