मुंबई - RANBIR KAPOOR DAUGHTER RAHA : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्टची मुलगी राहा हिचे आधीपासूनच खूप चाहते आहेत. त्यामुळे राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले आहेत. नुकताच रणबीर राहाबरोबर इटलीच्या रस्त्यावर फिरताना दिसला. या फोटोत दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. रणबीर अनेकदा आपल्या मुलीबरोबर वेळ घालवताना दिसतो.
राहा वडील रणबीरबरोबर इटलीच्या रस्त्यावर भटकतानाचा फोटो
रणबीर आलियाची जोडी अलीकडेच इटलीतील क्रूझवर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसली. या सेलिब्रेशनचे अनेक न पाहिलेले फोटो ऑनलाइन समोर आले आहेत. त्यापैकी एक फोटो रणबीर आणि राहा यांचा आहे. यामध्ये दोघेही इटलीच्या रस्त्यावर फिरताना दिसले. चाहत्यांनी हे पाहताच कमेंट सेक्शनमध्ये वडील आणि मुलीच्या या गोड फोटोवर भरपूर प्रतिक्रिया आणि प्रेमही व्यक्त केले होते. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12:05 च्या सुमारास एका मुलीचे स्वागत केलं होतं. आलियाने तिच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये गर्दी केली आणि नवीन पालकांसाठी रेड हार्ट इमोटिकॉन आणि अभिनंदन संदेश टाकले होते.
आलिया तिच्या प्रीगर्स डायरीमधून तिच्या चाहत्यांना तिच्या गरोदरपणात वारंवार गोड फोटो देत होती. या जोडप्याने 14 एप्रिल 2022 रोजी रणबीरच्या मुंबईतील निवासस्थानी एका समारंभात अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांची लग्नगाठ बांधली होती.