मुंबई -Ranbir Alia spotted with Raha हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर जोडप्यांपैकी एक असलेले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अनेकदा त्यांची मुलगी राहाबरोबर दिसून येतात. राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही आतुर झालेले असतात. अलीकडेच हे जोडपे त्यांच्या प्रिय मुलीसह स्पॉट झाले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे पाहून चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये राहाच्या क्यूटनेसचे कौतुक करायला सुरुवात केली. फोटोत राहा रणबीरच्या कडेवर हसताना दिसत आहे. यावेळी रणबीर आणि राहाने पांढरे कपडे परिधान मॅचिंग केल्याचे दिसते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राहाने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला असून त्यात ती खूपच गोड दिसत आहे. तिचं सुंदर हसणं भुरळ घालत आहे. रणबीर आणि आलियानेही व्हाइट आउटफिट कॅरी केले होते. रणबीरने राहाला आपल्या कुशीत घेतल्याचं दिसत आहे.
रणबीर-आलिया आणि राहा यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच. चाहत्यांनी कमेंट सेक्शनचे कौतुक केले. एकाने लिहिले, 'राहा तिच्या आईकडे पाहून हसत आहे'. एकाने लिहिले, 'मम्मी पापा ट्विनिंग विथ राहा'. एका यूजरने 'सो क्यूट बेबी' अशी कमेंट केली आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर कपूर अखेरचा संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आलिया भट्टचा यापूर्वी 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट रिलीज झाला होता. आता दोघेही संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहेत ज्यामध्ये विकी कौशल त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.