मुंबई - Ram Charan Upasana Anniversary : तेलुगू सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कोनिडेलानं तिच्या लग्नाचा वाढदिवस एका खास पद्धतीनं साजरा केला. 14 जून रोजी या जोडप्याच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली. उपासना कोनिडेलानं एक सुंदर फोटो पोस्ट केला. ती पती राम चरण आणि मुलगी क्लिन काराबरोबर दिसत आहे. फोटोमध्ये राम चरण आणि उपासना यांनी त्यांची लाडकी मुलगी क्लिन कारा हिचे बोट धरलेले आहे. यात राम चरणनं बेज रंगाचा शर्ट घातला होता. तर उपासनानं निळ्या रंगाचा लॉग शर्ट घातला होता. त्यांचा व्हायरल होत असलेला हा फोटो अनेकांना आवडला आहे.
उपासना कोनिडेलानं शेअर केला फोटो :उपासना कोनिडेलानं फोटोबरोबर एक खास कॅप्शनही लिहिलं आहे की, "12 वर्षे एकत्रतेचे आहे.' तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. तुम्हा सर्वांनी आम्हांला खूप पाठिंबा दिला आहे. भविष्यातही तुम्ही असाच सपोर्ट करत राहाल अशी आशा आहे." या पोस्टवर उपासनानं पती राम चरण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोवर त्यानं कमेंट करत लिहिलं, "अरेरे, मला तुझा जीवनसाथीदार बनून खूप आनंद होत आहे. मी खूप खूश आहे." राम चरण आणि उपासना कॉलेजमध्ये एकत्र होते. यानंतर राम चरण उपासनाच्या प्रेमात पडला.