मुंबई - Adil Durrani-Somi Khan: राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीनं 'बिग बॉस 12' फेम सोमी खानशी विवाह केला आहे. या जोडप्यानं जयपूरमध्ये लग्न केलं असून आता दोघेही रिसेप्शनसाठी बंगळुरूला गेले आहेत. आदिल खान आणि सोमी त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अनेकजण या जोडप्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. याशिवाय काहीजण या जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत सोमीनं त्याच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
सोमी एका मुलाखतीत सांगितलं की, ''आमचे लग्न 3 मार्चला झाले. आम्ही शूटिंगदरम्यान भेटलो होतो. पण याआधी आमची पहिली भेट एका अवॉर्ड शोमध्ये झाली होती. आम्ही एकमेकांना ओळखून 7 महिने झाले आहेत. आदिल आणि माझ्यात सुरुवातीला मैत्री झाली. यानंतर आमच्यात एकमेकांबद्दल भावना निर्माण झाल्या. आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.''
सोमी खानची मुलाखत : सोमीनं पुढं सांगितलं, ''आम्हाला लग्न करायचं होतं. पण ते खासगी ठेवायचं होतं. मला आणि आदिलला कोणतीही नकारात्मकता, वाद आणि प्रसिद्धीझोतात यायचं नव्हते. आम्हाला आमच्या कुटुंबाबरोबर लग्नाचा सोहळा साजरा करायचा होता. माझ्या आणि आदिलच्या पालकांनी लग्नाचा दिवस निश्चित केला. त्या दिवशी आम्ही लग्न केलं. आदिलच्या कुटुंबाबरोबर माझे नाते खूप चांगले आहे. मी जयपूरचा आहे तर आदिलचं कुटुंब साऊथमधील आहे. त्यामुळे एकमेकांना जाणून घेताना आम्हाला छान वाटलं. या लग्नामुळे सर्वजण खूप आनंदी आहेत. मी अल्लाहचे आभार मानते की, सर्व काही ठीक झालं.''
बंगळुरूमध्ये होईल रिसेप्शन : यानंतर सोमी पुढं सांगितलं, ''आदिलच्या कुटुंबीयांकडून लग्नाच्या आधी आणि नंतरही अनेक मुस्लिम पद्धतीनं विधी करण्यात आल्या होत्या. या पद्धती माझ्यासाठी खूप वेगळ्या होत्या. आदिल आता जयपूरचा जावई आहे. आम्ही लवकरच लग्नाचे फोटो शेअर करणार आहोत. आमचे रिसेप्शन बंगळुरूमध्ये होणार आहे. आता आम्ही एका नव्या प्रवासाला निघालो आहोत. आता आम्हाला मागे वळून बघायचे नाही. मी आदिलबरोबर माझे भविष्य पाहत आहे. मला त्याचा भूतकाळ पाहायचा नाही.'' सोमी आदिलबरोबर लग्न केल्यामुळे आता खूश आहे. काही दिवसापूर्वी आदिलनं त्याच्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केली होती.
हेही वाचा :
- भारतीय वंशाच्या दिग्दर्शकाला मिळणार का ऑस्कर? वाचा, ऑस्कर 2024 नामांकनाची संपूर्ण यादी
- कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या पहिल्या दिवसाच्या शूटची झलक केली शेअर
- मिस वर्ल्ड 2024चे विजेतेपद पटकावल्यानंतर क्रिस्टिना पिस्कोव्हाचं विधान आलं समोर