मेलबर्न AUS vs IND Boxing Day Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील बॉक्सिंग-डे कसोटी मेलबर्नमध्ये सुरु आहे. त्याचा पहिला दिवस संपला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 6 गडी गमावून 311 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ 68 आणि कर्णधार पॅट कमिन्स 8 धावा करुन नाबाद परतले.
Steve Smith remains unbeaten at the end of Day 1 as India fight back in the final session.#WTC25 | #AUSvIND 📝: https://t.co/rwOpsAESqm pic.twitter.com/NCLraL69Xc
— ICC (@ICC) December 26, 2024
भारताचं शेवटच्या सत्रात पुनरागमन : या सामन्यात कांगारु संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचं सिद्ध झालं. सलामीवीरांनी या मालिकेतील सर्वात मोठी आणि दमदार सुरुवात केली. 19 वर्षीय युवा नवोदित सॅम कॉन्स्टासच्या आक्रमक फलंदाजीनं भारतीय संघ बॅकफूटवर होता. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं. मात्र अखेरच्या सत्रात जसप्रीत बुमराहच्या बळावर भारतानं दमदार पुनरागमन केलं.
Four Australians brought up half-centuries in front of 87,242 fans.
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
Your Day One #AUSvIND blog recap: https://t.co/LSqCHmFFaf pic.twitter.com/StioiNRJzZ
कॉन्स्टसचा कहर, 4 फलंदाजांची अर्धशतकं : चौथा कसोटी सामना आज म्हणजेच 26 डिसेंबरपासून सुरु झाला. सॅम कॉन्स्टासनं ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केलं. त्यानं अपेक्षेप्रमाणे अचूक कामगिरी केली. काही चेंडूंचा सामना केल्यानंतर, कॉन्स्टसनं मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाजावर आक्रमण केलं आणि चौकारांचा पाऊस पाडला. त्यानं केवळ 52 चेंडूत 50 धावा केल्या आणि 65 चेंडूत 60 धावांची खेळी करुन तो आउट झाला.
That’s Stumps on Day 1
— BCCI (@BCCI) December 26, 2024
Australia reach 311/6 with Jasprit Bumrah leading the way with 3️⃣ wickets
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/8CPfzzk1gH
कांगारुंची दमदार सुरुवात : या डावात ऑस्ट्रेलियन संघाची दमदार सुरुवात झाली. त्यानंतर उर्वरित फलंदाजांचं मनोबलही वाढलं आणि त्यांनीही अर्धशतकं झळकावली. कॉन्स्टसशिवाय खराब फॉर्ममधून जात असलेल्या उस्मान ख्वाजानंही 121 चेंडूत 57 धावा, मार्नस लॅबुशेननं 145 चेंडूत 72 धावा आणि स्टीव्ह स्मिथनं नाबाद 68 धावा केल्या. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियानं 25 षटकात 112 धावा केल्या. दुसऱ्या सत्रात 28 षटकांत 64 धावा झाल्या. या काळात त्यांनी केवळ 2 विकेट गमावल्या आणि कांगारु संघ मजबूत स्थितीत उभा राहिला.
बुमराहनं केलं पुनरागमन : तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत फलंदाजीला आला. संघानं 2 गडी गमावून 237 धावा केल्या होत्या. यानंतर जसप्रीत बुमराहनं सलग विकेट घेत भारताचं पुनरागमन केलं. प्रथम वॉशिंग्टन सुंदरनं मार्नस लॅबुशेनची विकेट घेतली. त्यानंतर बुमराहनं धोकादायक ट्रॅव्हिस हेडला शून्य धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या पुढच्याच षटकात त्यानं मिचेल मार्शलाही बाद केलं. अशाप्रकारे भारतानं 9 धावांत 3 विकेट्स घेत सामन्यात पुनरागमन केलं. तर दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी आकाश दीपनं ॲलेक्स कॅरीची विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियानं 6 गडी गमावून 311 धावा केल्या आहेत. तर स्टीव्ह स्मिथ 68 धावा करुन नाबाद परतला आणि कर्णधार पॅट कमिन्स 8 धावा करुन नाबाद परतले.
हेही वाचा :