मुंबई Rakhi sawant : बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हटली जाणारी राखी सावंत पुन्हा एक प्रसिद्धी झोतात आली आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता हा व्हिडिओ पाहून अनेकजण तिला ट्र्र्र्रोल देखील करत आहे. राखी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. आदिल खान दुर्राणीबरोबर सुरू असलेल्या वादांमध्ये ती पूर्वाश्रमीचा पती रितेश सिंहबरोबर हँग आउट करताना दिसत आहे. बऱ्याच दिवसांनी ती रितेशबरोबर दुबईहून परतली आहे. मुंबई विमातळावर दोघेही एकत्र स्पॉट झाले. आता यावेळी दोघांनीही राखीच्या बोटामधील अंगठीबद्दल विधान केलं आहे.
राखी सावंत झाली पुन्हा एकदा ट्रोल : राखी सावंतनं आपल्या नव्या वक्तव्यानं खळबळ उडवून दिली. व्हिडिओमध्ये राखी सावंत तिची मोठी सॉलिटेअर अंगठी दाखवत आहे. राखी सावंतचा दावा आहे की तिच्या अंगठीची किंमत 50 कोटी रुपये आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, "या अंगठीची किंमत काय आहे हे ऐकलं तर तुम्ही इथेच खाली पडाल, मी घातलेल्या अंगठीची किंमत 50 कोटी रुपये आहे. 50 कोटीमध्ये मी सर्व विमानतळ खरेदी करू शकते."यानंतर राखी रितेशला अंगठीची किंमत सांगायला लावते, तो या अंगठीची किंमत 50 कोटी रुपये असल्याचं सांगतो. आता तिचा विमातळावरील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. काहीजण राखी सावंतला चांगलंच ट्रोल करत असून मूर्खपणा करत असल्याचं म्हणत आहेत.