महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'रोज तुझी आठवण...', राजकुमार रावनं आईच्या आठवणीत शेअर केली भावूक पोस्ट - Rajkummar mother death anniversary

Rajkummar's Mother 8th Death Anniversary: अभिनेता राजकुमार रावची आई कमलेश यादव यांची आज 8वी पुण्यतिथी आहे. याप्रसंगी त्यानं एक फोटो शेअर केला आहे.

Rajkummar's Mother 8th Death Anniversary
राजकुमारच्या आईची 8वी पुण्यतिथी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 5:22 PM IST

मुंबई - Rajkummar's Mother 8th Death Anniversary:अभिनेता राजकुमार रावची आई कमलेश यादव यांची 10 मार्च रोजी 8वी पुण्यतिथी आहे. 2016 रोजी राजकुमारच्या आईचे निधन झाले होते. आता आज त्यांनं आपल्या आईच्या आठवणीत एक इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नामधील एक फोटो शेअर केला आहे. राजकुमार त्याच्या आईच्या खूप जवळचा होता. तो अनेकदा आपल्या आईबद्दल बोलत असतो. सोशल मीडियावर अनेकदा तो आपल्या आईचे फोटो देखील शेअर करतो. आता राजकुमारच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

राजकुमार राव शेअर केला फोटो : त्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या आईच्या फ्रेम पुढे उभा असल्याचा दिसत आहे. याशिवाय त्याच्या पत्नीची पाठ कॅमेऱ्याच्या दिशेने आहे. राजकुमारने या फोटोला कॅप्शन दिले, 'आई, तू नेहमीच या जगातील सर्वोत्तम आई राहशील. तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत हे मला माहीत आहे. रोज तुझी आठवण येते. मी नेहमी तुझ्यावर खूप प्रेम करतो. या पोस्टवर राजकुमार चाहते त्याला पाठिंबा देत त्याला हिंम्मत देताना दिसत आहेत. काहीजण या पोस्टवर हात जोडलेले इमोजी शेअर करत आहेत.

राजकुमार रावचे आगामी चित्रपट :राजकुमारच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर, तो आता अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहे. हा चित्रपट यावर्षी 17 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो आगामी बायोपिक 'एसआरआय'मध्येही दिसणार आहे. 'एसआरआय' या चित्रपटाची कहाणी श्रीकांत भोल्ला या उद्योगपतीच्या प्रेरणादायी प्रवासाभोवती फिरणारी आहे. 'एसआरआय' 17 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय पुढं तो अभिनेत्री श्रद्धा कपूरबरोबर 'स्त्री 2' या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट त्याचा हॉरर आणि कॉमेडी आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक करत आहे. या चित्रपटाची चर्चा बऱ्याचं दिवसांपासून आहे.

हेही वाचा :

  1. राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्राणीबरोबर लग्न केल्यानंतर सोमी खाननं दिली प्रतिक्रिया
  2. भारतीय वंशाच्या दिग्दर्शकाला मिळणार का ऑस्कर? वाचा, ऑस्कर 2024 नामांकनाची संपूर्ण यादी
  3. कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या पहिल्या दिवसाच्या शूटची झलक केली शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details