मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत थलाईवा रजनीकांत हे आज 12 डिसेंबर रोजी आपला 74वा वाढदिवस साजरा करत आहे. आज या विशेष प्रसंगी अनेक चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वयाच्या 74व्या वर्षीही रजनीकांत चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहेत. आता देखील त्यांची चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरतात. दरम्यान रजनीकांत यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साऊथ सुपरस्टार कमल हासन यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'प्रिय मित्र, सुपरस्टार रजनीकांत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे आणखी हिट चित्रपट व्हावे, दीर्घायुष्य!'
रजनीकांत यांना दिल्या स्टार्सनं शुभेच्छा :तसेच साऊथ अभिनेता व्यंकटेश दग्गुबती यांनी शुभेच्छा देत लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा रजनीकांत गारू, आशा आहे की तुमचे वर्ष आश्चर्यकारक जावो!' तसेच थलपती विजयनं रजनीकांत यांच्यासाठी एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं लिहिलं, 'प्रिय आणि आदरणीय सुपरस्टार श्री. रजनीकांत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.' याशिवाय कार्तिक सुब्बाराज यांनी त्याच्या पोस्टमध्ये शुभेच्छा देताना लिहिलं, 'थलाईवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.' बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफनं रजनीकांत यांच्यासाठी शेअर केलेल्या आपल्या पोस्टवर लिहिलं, ' नेहमीच आनंदी रजनीकांत.' याशिवाय यावर त्यांनी एक हार्ट देखील शेअर केलं आहे. तसेच संगीतकार अनिरुद्ध रविचंदरनं देखील एक पोस्ट शेअर करत रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'थलाईवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझ्यावर खूप प्रेम आहे.' याशिवाय त्यानं पोस्टवर हार्ट आणि नमस्कार जोडला आहे. तसेच लायका प्रॉडक्शन हाऊननं त्याच्या पेजवर पोस्ट शेअर करून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.