महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रजनीकांत स्टारर ॲक्शन चित्रपट 'वेट्टयान'ला मिळालं 'यूए' प्रमाणपत्र, निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट - RAJINIKANTH

Vettaiyan UA Certificate : साऊथचा मेगास्टार रजनीकांतचा आगामी चित्रपट 'वेट्टयान' रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रमाणपत्राविषयी एक अपडेट शेअर केली आहे. गेल्या सोमवारी निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली होती.

Vettaiyan UA Certificate:
'वेट्टयान'चं प्रमाणपत्र ('वेट्टयान' पोस्टर (@lycaproductions Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 3:05 PM IST

मुंबई Vettaiyan UA Certificate : साऊथचा मेगास्टार रजनीकांत स्टारर 'वेट्टयान' या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहात आहेत. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वेट्टयान' निर्मात्यांनी गेल्या सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. आता या चित्रपटाला आज 1 ऑक्टोबर रोजी प्रमाणपत्र मिळल्याची बातमी समोर आली आहे. मंगळवारी लायका प्रॉडक्शन हाऊसनं 'वेट्टयान' चित्रपटामधील रजनीकांतचं नवीन पोस्टर शेअर केलं. यावर त्यांनी या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाल्याबद्दलची माहिती दिली.

'वेट्टयान'बद्दल दिली चाहत्यांना माहिती :निर्मात्यांनी या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हंट सर्टिफाईड 'वेट्टयान'ला स्टॅम्प मिळाला आहे. एका विलक्षण ॲक्शन-पॅक चित्रपटासाठी सज्ज व्हा. 'वेट्टयान' 10 ऑक्टोबर रोजी तामिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होत आहे.' दरम्यान मंगळवारीच निर्मात्यांनी 'वेट्टयान'च्या ट्रेलर रिलीजची डेट जाहीर केली होती. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, गांधी जयंतीच्या मुहूर्तावर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल. दरम्यान इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना यावर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं,' ध्येय सेट केले आहे. 'वेट्टयान'चा ट्रेलर 2 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. शिकार पकडण्यासाठी सज्ज व्हा."

'वेट्टयान' चित्रपटाबद्दल :'वेट्टयान' हा रजनीकांतचा 170वा चित्रपट आहे. लायका प्रॉडक्शन निर्मित हा चित्रपट, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि तिरुवनंतपुरमसह भारतातील अनेक ठिकाणी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 160 कोटींचं सर्वसाधारण बजेट असलेला 'वेट्टयान' हा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटात रजनीकांतबरोबर बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय फहद फसिल, राणा दग्गुबती, मंजू वॉरियर, रितिका सिंग, रोहिणी, दुशरा विजयन, राव रमेश हे कलाकार या चित्रपटात आहेत. दरम्यान रजनीकांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'जेलर' या चित्रपटामध्ये दिसला होता. आता पुढं 'जेलर 2' आणि 'कुली' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. रजनीकांतच्या 'वेट्टयान'मधील दुसरं गाणं रिलीज, अनिरुद्ध रविचंदरच्या अप्रतिम संगीतानं पुन्हा एकदा केली जादू - Vettaiyanरजनीकांतच्या 'वेट्टय्यान'शी संघर्ष टाळण्यासाठी सुर्यानं 'कांगुवा'ची रिलीज डेट पुढे ढकलली - kanguva Movie
  2. सुपरस्टार रजनीकांतच्या डबिंग सेशनचा 'वेट्टय्यान' निर्मात्यांनी बीटीएस व्हिडिओ केला शेअर - Vettaiyan makers BTS video

ABOUT THE AUTHOR

...view details