मुंबई -Rajeev khandelwal :अभिनेता राजीव खंडेलवाल हा एकेकाळी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. त्यानं टीव्ही सोडून चित्रपटांमध्ये काम करणे पसंत केलं होतं. राजीवच्या पहिल्याच चित्रपटापासून त्यांच्या अभिनयाची चर्चा बॉलिवूडमध्ये होऊ लागली होती. त्यानं आजपर्यंत पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. आता तो नुकताच 'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर रिलीज झालेल्या 'शोटाइम'मध्ये इमरान हाश्मी आणि श्रेया सरनबरोबर दिसला होता. आता राजीवनं पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्याच्या बंदीबाबत एक विधान केलं आहे. आता नुकत्याचं झालेल्या मुखतीत त्यानं मोकळ्या मनानं आपल्याविषयी काही गोष्टी चाहत्याबरोबर शेअर केल्या.
'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणं चुकीचं', राजीव खंडेलवालचं विधान - rajeev khandelwal statement - RAJEEV KHANDELWAL STATEMENT
Rajeev khandelwal : राजीव खंडेलवालनं पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्याचं चुकीच म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यानं हे विधान केलंय.
Published : Jul 29, 2024, 4:28 PM IST
राजीव खंडेलवालनं केलं पाकिस्तानी कलाकारांवर विधान : या मुलाखतीत त्यानं म्हटलं, "नाही नाही, हे सर्व राजकारण आहे, खूप चुकीचं आहे. लोकांना बंदी घालणारे राजकारणी कोण आहेत? आपले राजकारण काही गोष्टींवर हुकूमत गाजवत आहे. राजकारणामुळे लोकांमध्ये प्रेम वाढू शकत नाही. आम्ही शांततेबद्दल बोलतो, त्यामुळे जिथे शांतता नांदत आहे तिथेही राजकीय पक्षांचे लोक येऊन हिंदू-मुस्लिम यांच्यात चुकीचं काही बोलतात. पाकिस्तान सरकार त्या कलाकारांना एजंट म्हणून इथे पाठवत नाही. प्रत्येकाला प्रेम मिळालं पाहिजे." 2016 मध्ये उरी येथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील विविध कलाकार आणि चित्रपट संघटनांनी पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करण्यास बंदी घातली होती. यानंतर काही कलाकारांनी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यामातून दु:ख व्यक्त केलं होतं.
राजीव खंडेलवालचं वर्कफ्रंट : राजीवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 'कहीं तो होगा', 'लेफ्ट राइट लेफ्ट'आणि 'सच का सामना' सारख्या लोकप्रिय शोमध्ये काम केलंय. 2008 मध्ये त्यानं 'आमिर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच्या पहिल्याच चित्रपटामधील त्याची भूमिका ही अनेकांना आवडला होती. यासाठी त्याला खूप प्रशंसा देखील मिळाली होती. यानंतर त्यानं 'शैतान' (2011) आणि 'टेबल नंबर 21' (2013), 'ब्लडी डैडी' (2023)सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. राजीवचा ओटीटी शो 'शोटाइम' नुकताच दुसऱ्या सीझनमध्ये आहे.