मुंबई Rahul Vaidya , Disha Parmar : गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांची जोडी लोकांना आवडते. नुकतेच हे दोघं एका मुलीचे आई-वडील झाले आहेत. आता हे जोडपे आपल्या मुलीसह महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. राहुलनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण कुटुंब महालक्ष्मी जगदंबा मंदिरात जाताना दिसत आहे. राहुलनं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून त्याच्या मुलीवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
नव्याच्या या क्यूटनेसवर चाहत्यांची मनं भाळली :महालक्ष्मी जगदंबेचा आशीर्वाद घेतल्यानंतर राहुलनं मंदिराच्या गोठ्यात उभ्या असलेल्या गाईशी आपल्या लहान नव्याची ओळख करून दिली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राहुल आपल्या मुलीला धरून गाय दाखवताना दिसत आहे. यादरम्यान नव्याचा क्युटनेस पाहण्यासारखा आहे. राहुल आणि दिशाच्या मुलीचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना राहुलनं लिहलं, ''माझा जन्म झाला तेव्हा, माझ्या आईनं मला महालक्ष्मी मातेच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेतला होता. तसेच आमची मुलगी नव्यानं माताजींच्या चरणी डोक टेकवून मी आणि दिशानं आशीर्वाद घेतला आहे.'' आता राहुलची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.