मुंबई - Pyar Ke Do Naam Movie : रिलायन्स एंटरटेनमेंटनं आज 4 एप्रिल रोजी आपल्या 'प्यार के दो नाम' या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. आता सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल झालं आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाची लीड स्टार कास्ट दिसत असली तरी त्यांचे चेहरे प्रेमाच्या पुस्तकातून लपलेले आहेत. 'प्यार के दो नाम' या चित्रपटाचं दिग्दर्शन दानिश जावेद करणार आहे. चित्रपटाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये, अभिनेता आणि अभिनेत्री हिरव्यागार बागेत खुर्चीच्या मागे उभे असलेले दिसत आहेत. अभिनेत्रीनं लॅव्हेंडर गुलाबी रंगांनाचा सुट परिधान केला आहे. तर दुसरीकडे अभिनेत्यानं निळ्या रंगाचा थ्री-पीस सूट घातला आहे.
5 एप्रिल रोजी होणार खुलासा : अभिनेत्रीच्या हातात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुस्तक आणि अभिनेत्याच्या हातात जगाला शांतीचा संदेश देणारे महान नेल्सन मंडेला यांचं पुस्तक दिसत आहे. आता पुस्तकामागील या चेहऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर असू शकतात. सध्या निर्मात्यांनी यांच्या नावाचा खुलासाही केलेला नाही. 5 एप्रिल रोजी पोस्टरमधील या स्टार्सच्या चेहऱ्यांवरून हे पुस्तक हटवण्यात येणार आहे. या चित्रपटाला अंजन भट्टाचार्य आणि शब्बीर अहमद यांनी संगीत दिलं आहे. 'प्यार के दो नाम' चित्रपटाचे निर्माते विजय गोयल आणि दानिश जावेद हे आहेत.