महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2' रिलीजपूर्वी 'पुष्पा 3'ची बातमी कन्फर्म; अल्लू अर्जुन केला खुलासा - अल्लू अर्जुन

Pushpa 3 CONFIRMED! : अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा 2: द रुल' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. आता 'पुष्पा 2' रिलीज होण्याआधीच 'पुष्पा 3'चीही निर्मिती होेणार असल्याची बातमी कन्फर्म झाली आहे.

Pushpa 3 CONFIRMED
पुष्पा 3 कंफर्म

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 12:40 PM IST

मुंबई - Pushpa 3 CONFIRMED! :साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा - द राइज'चा दुसरा भाग 'पुष्पा 2: द रुल' रिलीज काही दिवसानंतर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची वाट चाहते आतुरतेनं पाहत आहेत. 'पुष्पा - द राइज' (पहिला भाग) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता आणि 'पुष्पा'मधील गाणी देखील जगभर हिट झाली होती. आता या चित्रपटाची पुढील कहाणी काय असेल, हे 'पुष्पा-द रुल'मध्ये दाखवलं जाणार आहे. दरम्यान 'पुष्पा 2' रिलीज होण्याआधीच 'पुष्पा 3' ची पुष्टी झाली आहे. अल्लू अर्जुननं एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला आहे.

अल्लू अर्जुन केली 'पुष्पा 3'वर भाष्य : मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा अल्लू अर्जुनला 'पुष्पा 3'च्या पसरलेल्या बातम्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यानं म्हटलं, ''तुम्ही नक्कीच चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची अपेक्षा करू शकता. आम्हाला एक फ्रँचायझी बनवायची आहे आणि आमच्याकडे लाइनअपसाठी रोमांचक कल्पना आहेत.'' आता 'पुष्पा 3' हा चित्रपटही बनणार असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'पुष्पा 2' रिलीज झाल्यानंतर 'पुष्पा 3'ची घोषणा केली जाऊ शकते. जर 'पुष्पा 2'नं पहिल्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर चाहत्यांना 'पुष्पा 3' ची भेट मिळू शकते. 'पुष्पा 3' देखील चित्रपटाचा शेवटचा भाग नसल्याचं बोललं जात आहे. निर्माते पुष्पा फ्रँचायझी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

'पुष्पा 3'चं शीर्षक : 'पुष्पा 3' चित्रपटाचे नाव 'पुष्पा - द रोअर' असल्याचं बोललं जात आहे, मात्र 'पुष्पा'च्या निर्मात्यांनी अद्याप या वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. आता चाहते 'पुष्पा 3'च्या लेटेस्ट अपडेटबद्दल वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' म्हणजेच 'पुष्पा-द रुल' 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबरोबर रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम 3' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. दरम्यान 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना ही हिट जोडी पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. मुलगी ईशा देओलच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्रला बसला धक्का
  2. आमिर खान, किरण राव दिल्लीत 'लापता लेडीज'च्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित राहणार
  3. 'छावा'च्या शूटिंगमध्ये हात फ्रॅक्चरही होऊन विकी कौशलची जिद्द, म्हणाला "थांबू शकत नाही"

ABOUT THE AUTHOR

...view details