मुंबई : 'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडमध्ये 'पुष्पा 2'च्या वर्ल्डवाइड कलेक्शननं बॉक्स ऑफिसवर 1400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनच्या अटकेमुळे चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. यानंतर काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर चित्रपटाच्या कमाईत घसरण होईल, असं मानलं जात होतं, मात्र असं काही झालं नसून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करताना दिसत आहे.
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार या चित्रपटानं वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर 12 दिवसात 1,409 कोटीचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट रोज अनेक विक्रम बनवत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 1500 कोटी लवकरच कमाई करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सुकुमार दिग्दर्शित, या ब्लॉकबस्टर चित्रपटानं राजामौलीच्या 'आरआरआर' आणि यशच्या 'केजीएफ 2'ला मागे टाकल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. हा चित्रपट कमाईबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय 'पुष्पा 2' लवकरच राजामौलीच्या 'बाहुबली 2' (1,417) आणि आमिर खानच्या 'दंगल' (2,070 कोटी)ला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड जलद गतीनं कमाई करत आहे.
सर्वाधिक कमाई :या चित्रपटानं सर्वाधिक कमाई हिंदी पट्ट्यामध्ये केली आहे. रिलीजच्या 12व्या दिवशी 'पुष्पा 2' चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 27.75 कोटीचा व्यवसाय केला आहे. यानंतर या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 929.85चं झालं आहे. हा चित्रपट जनतेच्या अपेक्षेवर खरा उतरला आहे. आता देखील चित्रपटगृहांमध्ये 'पुष्पा 2' पाहण्यासाठी गर्दी जमताना दिसत आहे. 'पुष्पा 2' नं तिसऱ्या वीकेंडला प्रवेश केला आहे. हा चित्रपट आता 'मुफासा: द लायन किंग'शी बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करताना दिसणार आहे.
विविध भाषांमध्ये 12व्या दिवसाची कमाई खालीलप्रमाणे होती
तेलुगु: 5.45 कोटी