मुंबई - Pushpa 2 :साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' मधील पहिलं गाणं 'पुष्पा-पुष्पा' आज 1 मे रोजी संध्याकाळी प्रदर्शित होत आहे. चित्रपट निर्मात्यांनी 30 एप्रिलच्या संध्याकाळी 'पुष्पा-पुष्पा' गाण्यातील अल्लू अर्जुनचं पोस्टर शेअर करून याबद्दलची माहिती दिली होती. याआधी हे गाणं आज सकाळी 11 वाजता रिलीज होणार होतं आणि लगेचच निर्मात्यांनी त्याची वेळ बदलली. आज, 1 मे रोजी, निर्मात्यांनी अल्लू अर्जुनचं आणखी एक आकर्षक पोस्टर शेअर केलं आहे. मैत्री मूव्ही मेकर्स आणि अल्लू अर्जुन यांनी स्वतः 'पुष्पा-पुष्पा' गाण्यामधील नवीन दमदार पोस्टर शेअर केल्यानंतर अनेकजण या चित्रपटाबद्दल उत्सुक असल्याची प्रतिक्रिया पोस्टमध्ये करताना दिसत आहेत.
'पुष्पा 2: द रुल'मधील पोस्टर :या पोस्टरमध्ये अल्लू हा कारसमोर उभा असल्याचं दिसत आहे. त्यानं काळ्या पॅन्टसह गडद गुलाबी रंगाचा नक्षीदार शर्ट घातला आहे. याशिवाय त्याच्या डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत निर्मात्यांनी यावर लिहिलं, "भारताचा मास सेंसेशन पुष्पा राज इथे आहे. चला आज 'पुष्पा-पुष्पा' या ब्लॉकबस्टर गाण्याचं स्वागत करूया, 'पुष्पा 2'चा फर्स्ट सिंगल आज संध्याकाळी 5.04 वाजता तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगालीमध्ये रिलीज होईल. 'पुष्पा 2' 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे." आता या चित्रपटासाठी चाहते खूप आतुर आहेत.