महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' जगभरात 11500 स्क्रीन्सवर ग्रँड रिलीजसह करणार धमाका... - ALLU ARJUN

'पुष्पा 2'चे निर्माते रविशंकर यांनी या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट दिली आहे. याशिवाय या चित्रपटाच्या आयटम साँगमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिसणार आहे.

pushpa 2
पुष्पा 2 (Pushpa 2 producer Ravi Shankar (left), film's poster featuring Allu Arjun (right) (Photo: ANI/ Film Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 27, 2024, 2:27 PM IST

मुंबई : ब्लॉकबस्टर 'पुष्पा'चं: 'द राइज'चा बहुप्रतीक्षित सीक्वेल, 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 5 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शनासाठी सज्ज आहे. निर्माता रविशंकर यांनी अलीकडेच या चित्रपटाबाबत एक अपडेट शेअर केली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं. 'आम्ही रिलीजची तारीख जवळपास एक दिवस आधीच ठेवली आहे. हा चित्रपट यापूर्वी 6 डिसेंबर, होणार होता. आता आम्ही 5 डिसेंबरला चित्रपट जगभरात रिलीज करत आहोत. 'पुष्पा 2: द रूल'साठी 5000 स्क्रीन्स परदेशात आणि 6500 स्क्रीन्स देशांतर्गत असतील.' म्हणजेच या चित्रपटाला एकूण 11500 स्क्रिन जगभरात मिळेल.

'पुष्पा 2'बद्दल निर्माता रविशंकर यांनी सांगितलं चित्रटाबद्दल: निर्माते रविशंकर यांनी पुढं सांगितलं, 'चित्रपट पूर्ण करण्यासाठी आणि वेळेवर प्रदर्शित करण्यासाठी आम्ही अथक परिश्रम घेत आहोत. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर उत्कृष्टता दाखवण्याची आमची जबाबदारी लक्षणीयरीत्या वाढली आहे.' 'पुष्पा 2: द रूल' चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कहाणी लाल चंदन तस्करी अंडरवर्ल्डमधील सत्ता संघर्षांभोवती फिरणारी आहे. हा चित्रपट सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा 2: द रूल' रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटामधील गाणी देखील प्रसिद्धी झाली आहेत.

आयटम साँगमध्ये दिसेल 'ही' बॉलिवूड अभिनेत्री : दरम्यान 'पुष्पा द राईज'साठी अल्लू अर्जुनला त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला गेला आहे. दरम्यान अल्लू अर्जुननं अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्टरचे अनावरण केले होते. या पोस्टरमध्ये तो राउडी अंदाजात दिसत होता. सध्या अल्लू अर्जुनचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत. दरम्यान 'पुष्पा 2: द रुल'चे दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना यावेळी काही खास दृश्य दाखविण्याच्या विचार करत आहेत. 'पुष्पा 2: द रूल' चित्रपटात श्रद्धा कपूरचे आयटम साँग देखील लोकांना पाहायला मिळणार असल्याचं समजत आहे. रिपोर्टनुसार, या गाण्यात अल्लू अर्जुनबरोबर श्रद्धा कपूर असणार आहे, हे दोन्ही स्टार्स पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'ला मिळाली नवीन रिलीज डेट, जाणून घ्या कधी येईल पडद्यावर
  2. 'पुष्पा 2'मध्ये 'ॲनिमल' स्टारनं केली एन्ट्री, अल्लू अर्जुनच्या चित्रपटात होईल धमाका
  3. 'देवरा पार्ट 1' पाहताना थिएटरमध्ये 'पुष्पा 2'चा टीझर पाहिल्यावर चाहते झाले उत्साहित, व्हिडिओ व्हायरल - pushpa 2 teaser

ABOUT THE AUTHOR

...view details