महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'नं 1300 कोटींचा आकडा पार केल्यानंतर अल्लू अर्जुन दु:खी, जाणून घ्या कारण... - ALLU ARJUN SHARE POST

भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'पुष्पा 2' चित्रपट तिसऱ्या स्थानवर आहे. मात्र तरीही अल्लू अर्जुन दु:खी आहे.

pushpa 2
पुष्पा 2 (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : 6 hours ago

मुंबई :साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2 द रुल' या मास ॲक्शन ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर धमाकेदार कमाई करत आहे. 'पुष्पा 2'नं जागतिक स्तरावर 1300 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या भरघोस कमाईनंतर अल्लू अर्जुन मनातून दु:खी आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या पेड प्रीव्यूदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्यानं तो आता दुःख आहे. अल्लू अर्जुननं मृत महिलेच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्याची जाहीर केलं आहे. आता अल्लू अर्जुननं यासंदर्भात आणखी पोस्ट शेअर केली आहे.

'पुष्पा 2' आणि अल्लू अर्जुन :अल्लू अर्जुन देखील' पुष्पा 2'साठी 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या चित्रपटगृहामध्ये पोहोचला होता. जिथे त्याला पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी झाली. यानंतर गर्दीमुळे तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि याठिकणी गोंधळ सुरू झाला. यात प्रेक्षकांच्या गर्दीत रेवती नावाची महिला अडकली आणि तिचा गुदमरून मृत्यू झाला. 'पुष्पा 2' चित्रपट पाहण्यासाठी महिला आपल्या पती आणि मुलांसह संध्या थिएटरमध्ये पोहोचली होती. दरम्यान याप्रकरणी अल्लू अर्जुनला आता कोर्टात जावं लागलं होतं. कोर्टानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता अल्लू अर्जुनला सुनावणीच्या दिवशीच कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला होता. यानंतर अल्लू अर्जुनचे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती. मात्र पुष्पराजच्या मनात अजूनही दु:ख आहे.

अल्लू अर्जुनची पोस्ट :सुटका झाल्यानंतर, अल्लू अर्जुननं काल रात्री त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली, यामध्ये त्यानं लिहिलं की, 'मी अजूनही श्रीतेज (चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मृत महिलेचा मुलगा) बद्दल काळजीत आहे, ज्यावर उपचार सुरू आहेत, दुर्दैवानं तो बळी पडला. मला सध्या त्याच्या कुटुंबीयांना आणि मुलांना भेटण्यास मनाई आहे. परंतु माझ्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. मी तुमच्या पूर्ण उपचारांसाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे, अशी माझी इच्छा आहे. मी त्यांच्या कुटुंबाला भेटायला तयार आहे.' दरम्यान 'पुष्पा 2' चित्रपटानं 11 दिवसांत जागतिक स्तरावर 1300 कोटी रुपयांचा टप्पा पार करून 'आरआरआर' (1200 कोटींहून अधिक) आणि केजीएफ (1200 कोटींहून अधिक)चं रेकॉर्ड तोडलं आहेत. 'पुष्पा 2' हा भारतीय चित्रपटातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. सर्वात मोठी कमाई 'दंगल' (2024 कोटी रुपये)नं केली. हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे आणि प्रभासचा 'बाहुबली 2' (1810 कोटी रुपये) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर येत्या आठवड्यात 'पुष्पा 2' हा 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड तोडेल, असं सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'नं जगभरात कमवला 1300 कोटींचा गल्ला, 'आरआरआर', 'केजीएफला 2'ला ही टाकलं मागं
  2. अल्लू अर्जुनच्या घरी रात्रीपर्यंत स्टार्सचा मेळा, तुरुंगातून सुटकेनंतर 'पुष्पराज'ला मिळाला पाठिंबा
  3. अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा 2'चा जगभरात दबदबा कायम, गाठला 'इतक्या' कोटीचा आकडा

ABOUT THE AUTHOR

...view details