मुंबई :'पुष्पा 2: द रुल' सध्या देश आणि जगाच्या बॉक्स ऑफिसवर दबदबा गाजवत आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1500 कोटी कमाई करण्याच्या जवळ आहे. हा चित्रपट भारतात देखील 1000 कोटींचा टप्पा ओलांडणाणार आहे. 'पुष्पा 2: द रुल' भारत,परदेशात आणि तेलुगू ते हिंदीसह सर्व भाषांमध्ये धमाकेदार कमाई करत आहे. याशिवाय अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2: द रुल'नं हिंदी पट्ट्यात एक नवा विक्रम केला आहे. 'पुष्पा 2: द रुल'नं हिंदीत 600 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट साऊथकडे कमी आणि हिंदी पट्ट्यामध्ये खूप कमाई करत आहे.
'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन :'पुष्पा 2: द रुल' हा भारतीय चित्रपट उद्योगातील एकमेव चित्रपट ठरला आहे, ज्यानं हिंदी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक वेगानं 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटानं 13व्या दिवसाच्या कमाईसह अनेक चित्रपटांचे विक्रम तोडले आहेत.' पुष्पा 2'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर (सर्व भाषांमध्ये) एकूण 953 कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय या चित्रपटानं जगभरात 1366.60 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'पुष्पा 2' हा भारतीय बॉक्स ऑफिसवर कोरोना नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' आमिर खानच्या दंगल आणि प्रभासच्या 'बाहुबली 2'ला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटामधील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाचा अभिनय हा अनेकांना पसंत पडला आहे. हा चित्रपट 500 कोटीमध्ये निर्मित करण्यात आला होता. आता येणाऱ्या काळामध्ये हा चित्रपट 1500 कोटीची कमाई करेल असं सध्या दिसत आहे. आता देखील हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.
हिंदी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
जवान- 582.31 कोटी
पठाण- 524.53 कोटी
बाहुबली 2- 510.99 कोटी