मुंबई -Priyanka chopra and Nick Jonas :अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका कार्यक्रमासाठी भारतात आली होती. यानंतर तिनं आपल्या कुटुंबासह बराच चांगला वेळ घालवला. ती श्रीराम मंदिरात दर्शनला अयोध्येला पोहोचली होती. यानंतर तिनं होळीसाजरी केली. तसेच तिनं चुलत बहीण मन्नारा चोप्राच्या वाढदिवसालादेखील हजेरी लावली होती. प्रियांका पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीबरोबर विदेशात रवाना झाले आहेत. प्रियांका 31 मार्चच्या पहाटे मुंबई विमानतळावर दिसली. तिथे निकनं सर्वांना शांत राहण्याचे संकेत दिले. जेणेकरून त्यांची मुलगी झोपेतून उठू नये. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकानं मुलगी मालतीला कडेवर धरले आहे.
प्रियांका आणि निक मुंबई विमातळावर स्पॉट : यावेळी प्रियांका व्हाईट लूकमध्ये होती. तर निक हिरव्या रंगाच्या पॅन्टसह काळ्या टी-शर्टमध्ये दिसला. प्रियांकाचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत प्रियांका आणि निकचं कौतुक करत आहे. आता प्रियांका तिच्या घरी जाण्यासाठी निघाली आहे. ती तिच्या कुटुंबासह लॉस एंजेलिसमध्ये राहते. प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर होळीच्या सेलिब्रेशनची झलकही शेअर केली आहे. चोप्रा कुटुंबानं मोठ्या उत्साहात होळी साजरी केली होती. व्हिडिओत मन्नारा प्रियांका आणि निकही ढोलाच्या तालावर खूप नाचले. प्रियांकानं यावेळी भारतातील अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती.