मुंबई Priyanka Chopra :बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही भाऊ सिद्धार्थच्या एंगेजमेंटसाठी भारतात आली होती. दरम्यान प्रियांका आगामी मराठी चित्रपट 'पाणी'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्येही स्पॉट झाली. 'देसी गर्ल'नं 23 ऑगस्ट रोजी अचानक मुंबईत येऊन तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी प्रियांकानं तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या आगामी मराठी चित्रपट 'पाणी'च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये 'देसी गर्ल'सह तिची आई मधु चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ हे देखील उपस्थित होते. आता तिनं मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी पहाटे तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्लिप शेअर केली आहे.
प्रियांका चोप्रानं शेअर केली पोस्ट : या क्लिपमध्ये ती 'गुडबाय मुंबई' म्हणताना दिसत आहे. ही क्लिप शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये "सी यू सून मुंबई..." असं लिहिलंय. दरम्यान लॉन्च इव्हेंटला प्रियांकानं निळ्या रंगाचा नक्षीदार सलवार सूट घातला होता. तिनं लाइट मेकअप आणि हाय हील्ससह आपला लूक केला. प्रियांका या पारंपरिक पोशाखात खूप देखणी दिसत होती. या प्रमोशनल इव्हेंटमधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियांकानं यावेळी पापाराझींबरोबर फोटोंसाठी पोझ दिली. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये 'देसी गर्ल'चं लक्ष तिच्यापासून काही अंतरावर बसलेल्या मुलाकडं जाते. ती त्याला तिच्या जवळ येण्याचा इशारा करते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून ती फोटोसाठी पोझ देते.