महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रतीक गांधी आणि विद्या बालनचे 'दो और दो प्यार'मधील 'जज्बाती है दिल' गाणे लॉन्च - Do Aur Do Pyaar song launch - DO AUR DO PYAAR SONG LAUNCH

Do Aur Do Pyaarsong launch : प्रतीक गांधी आणि विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'दो और दो प्यार' चित्रपटातील 'जज्बाती है दिल' गाणे लॉन्च झाले आहे. कुणाल वर्माने रचलेलं हे गीत अरमान मलिक आणि अनन्या बिर्ला यांनी गायलं आहे.

Do Aur Do Pyaarsong launch
'जज्बाती है दिल' गाणे लॉन्च

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 3:00 PM IST

मुंबई - Do Aur Do Pyaarsong launch : अभिनेत्री विद्या बालन आणि प्रतीक गांधी स्टारर 'दो और दो प्यार' चित्रपटातील 'जज्बाती है दिल' या पहिल्या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. अरमान मलिक आणि अनन्या बिर्ला यांनी या गाण्याला त्यांचा आवाज दिला आहे. कुणाल वर्माने हे सुंदर गीत लिहिले आहे.

गाण्याची लिंक इन्स्टाग्रामवर शेअर करत पॅनोरमा म्युझिकने लिहिले, "सौ दफा ये टुटेगा, फिर भी प्यार में कुदेगा. क्यूँ की 'जज्बाती है दिल' गाणे आऊट,'' असं लिहित गाण्याची लिंक देण्यात आली आहे. 'दो और दो प्यार' हा चित्रपट शिर्षा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शित केला आहे. यात इलियाना डिक्रूझ आणि सेंधिल राममूर्ती यांच्याही भूमिका आहेत.

'दो और दो प्यार'च्या निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. या व्हिडिओमध्ये या चित्रपटाची रोमँटिक रंजक कथा वेगळ्या प्रकारे सादर होणार असल्याची खात्री मिळते. विद्या आणि प्रतीक यांच्यातील संवादातून त्यांच्या विचारसरणीची ओळख होते. या टीझरमधील व्हिडीओमध्ये इलियाना आणि सेंधील यांनी साकारलेली पात्रंही इंटरेस्टींग आहेत. चित्रपटातील चारही पात्रे त्यांच्या नात्यातील उत्कट प्रेम आणि उत्साह पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वैवाहिक सुख परत आणण्यासाठी ते सहलींवर जातात.

'दो और दो प्यार'चा टीझर पाहिल्यानंतर अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर असल्याचं प्रेक्षकांच्या प्रतिक्रियावरुन कळतंय. अनेजण कमेंट्स करून विद्या आणि इलियानाला या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. आई झाल्यानंतर इलियाना पहिल्यांदाच या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अखेरची ' महिला मंडळी' या चित्रपटामध्ये दिसली होती. आता ती आगामी 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनबरोबर दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी यांनी केलंय.

हा चित्रपट अप्लॉज एंटरटेनमेंट, एलिपसिस एंटरटेनमेंट प्रॉडक्शनने सादर केला आहे. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Bade Miyan Chote Miyan Trailer OUT
  2. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियानं लग्नाचा 14 वा वाढदिवस केला साजरा, फोटो पाहून चाहते चकीत - Nawazuddin Siddiqui and Aaliya
  3. राम चरणच्या वाढदिवसाच्या निमित्त 'गेम चेंजर'मधील पहिलं गाणं होईल रिलीज - Ram Charan CDP birthday Celebration

ABOUT THE AUTHOR

...view details