मुंबई -बाहुबली स्टार प्रभास 23 ऑक्टोबरला त्याचा 45वा वाढदिवस साजरा करणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये प्रभास पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतात. प्रभास हा पहिला पॅन-इंडियन सुपरस्टार मानला जातो. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याविषयी काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.
'बाहुबली' चित्रपट ठरला प्रभाससाठी लकी : 'बाहुबली: द बिगिनिंग' या एपिक ॲक्शन चित्रपटानं प्रभासनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवलं. 'बाहुबली 2: द कन्क्लूजन'मध्ये त्यानं दुहेरी भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक यश मिळवलं. 'बाहुबली 2' हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. तेव्हापासून प्रभासला पॅन इंडियाचा स्टार म्हणून ओळख मिळाली.
प्रभासच्या नावावर 100 कोटींची ओपनिंग असलेले 5 चित्रपट :बाहुबली व्यतिरिक्त, प्रभासच्या बाकी चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली, यात ॲक्शन थ्रिलर 'साहो' आणि 'सालार: पार्ट 1 - सीझफायर' यांचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये आहेत. प्रभास हा एकमेव अभिनेता आहे ज्यानं 100 कोटींची ओपनिंग असलेले 5 चित्रपट दिले आहेत. यामध्ये 'बाहुबली 2', 'साहो', 'सालार', 'आदिपुरुष' आणि 'कल्की 2898 एडी' आहेत. आत्तापर्यंत प्रभासनं 20 हून अधिक चित्रपट केले आहेत.
टॉप 10 सर्वाधिक कमाई करणारे टॉलिवूड चित्रपट
1. बाहुबली 2: द कन्क्लूजन - रु. 1810 कोटी
2. आरआरआर- रु. 1300 कोटी
3. कल्की 2898 एडी - 1100 कोटी
4. बाहुबली – द बिगिनिंग – 650 कोटी