महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी'च्या प्री-रिलीझ इव्हेंटसाठी प्रभास मुंबईत दाखल, दीपिका पदुकोण टीममध्ये होईल सामील? - kalki 2898 ad pre release event - KALKI 2898 AD PRE RELEASE EVENT

Prabhas and kalki 2898 ad : साऊथ सुपरस्टार प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'चं प्री-रिलीज इव्हेंट हे मुंबईत होणार आहे. यानिमित्त प्रभास मुंबईमध्ये पोहोचला आहे.

Prabhas and kalki 2898 ad
प्रभास आणि कल्की 2898 एडी (प्रभास (IMAGE- IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 1:04 PM IST

मुंबई - Prabhas and kalki 2898 ad : साऊथ सुपरस्टार प्रभासचा मोस्ट अवेटेड आगामी चित्रपट 'कल्की 2898 एडी' रिलीज होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी'च्या प्रमोशनसाठी प्रभास 'मायानगरी' मुंबईत काल रात्री पोहोचला. आता त्याचे विमानतळावरील सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 'कल्की 2898 एडी'चा प्री-रिलीज इव्हेंट आज 19 जून रोजी मुंबईत होणार आहे. या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम दिसणार आहे. दरम्यान सर्वांच्या नजरा बॉलिवूड स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोणवर लागल्या आहेत.

'कल्की 2898 एडी' प्री-रिलीज इव्हेंट : ती 'कल्की 2898 एडी'च्या प्री-रिलीज इव्हेंटला उपस्थित राहणार की नाही याबद्दल आता प्रश्न निर्माण होत आहे. दीपिका गर्भवती असून तिच्या होणाऱ्या बाळाची पूर्ण काळजी घेताना दिसत आहे. यामुळे ती या कार्यक्रमाला हजर राहण्याची शक्यता कमी दिसत आहे. 'कल्की 2898 एडी'च्या निर्माते विजयंती मूव्हीज यांनी आज मुंबईत होणाऱ्या प्री-रिलीज इव्हेंटबद्दल त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून सांगितलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक पोस्टर दिसत आहे, ज्यात प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांची झलक आहे. 'कल्की 2898 एडी'चा प्री-रिलीज इव्हेंट आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून मुंबईत सुरू होणार आहे.

'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल : 'कल्की 2898 एडी' हा एक पौराणिक चित्रपट आहे. यामध्ये महाभारत काळापासून सुरू होईल आणि 2898 पर्यंतचा काळ दाखवला जाईल. या चित्रपटात प्रभास दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. 'कल्की 2898 एडी' 27 जून रोजी जगभरात प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, कमल हसन, गौरव चोप्रा, ब्रह्मानंदम, राणा डग्गुबती आणि डलकर सलमान हे स्टार्स 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहेत. आता हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

हेही वाचा :

  1. सलमान खान स्टारर 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो व्हायरल - SALMAN KHAN
  2. बिग बॉसच्या घरात अनिल कपूरला पाहायचे आहेत 'हे' बॉलिवूडचे कलाकार! - Anil Kapoor host Big Boss OTT
  3. 'चंदू चॅम्पियन'नं कपिल देवला केलं भावूक, म्हणाले 'चित्रपट चुकवू नका' - Kartik Aaryans Chandu Champion

ABOUT THE AUTHOR

...view details