मुंबई Poonam Pandey Passed Away : पूनम पांडेच्या इंन्स्टाग्राम (Poonam Pandey Instagram Post) अकाउंटवरून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. तिच्या अधिकृत इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. तुम्हाला कळवताना अत्यंत दुःख वाटत आहे की, सर्व्हायकल कॅन्सरने (Cervical Cancer Causes) आमच्या पूनमला आमच्यापासून हिरावलं आहे. ती आमच्या स्मरणात राहिल."
पूनमचं वय होतं अवघं 32 वर्ष : लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचं कर्करोगानं निधन झालंय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनमच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पूनमच्या निधानानं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. वयाच्या 32 व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला आहे.
काय आहे पूनमची इंस्टा पोस्ट? : पूनम मांडेनं तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे,"आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कर्करोगाशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिलं आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा एवढी विनंती". पूनमच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यात काही चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिती आहे, तर काहींनी हे अकाऊंट हॅक झालं आहे, ही पोस्ट खोटी ठरू देत अशा कमेंट्सही केल्या आहेत.
चाहत्यांना बसला धक्का : पूनमच्या इन्स्टाग्रामवरील ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. काहींच्या मते हा एक प्रँक आहे तर काही यूजर्स म्हणत आहेत की कदाचित पूनमचे अकाउंट हॅक झाले असावे. पण असंख्य लोक तिला श्रद्धांजलीही वाहताना दिसत आहेत. कर्करोगामुळं पूमनचं अवघ्या 32 व्या वर्षी निधन झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पूनमच्या मॅनेजरनं दिला दुजोरा : पूनम पांडेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या निधनाबद्दलची पोस्ट प्रसिद्ध झाल्यामुळं या बातमीवर अनेकांनी अविश्वास दाखवला होता. मात्र, पूनमची मॅनेजर पारुल चावला हिनं एका माध्यमासोबत बोलताना पूनमच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
पूनम सतत होती चर्चेत : पूनम पांडेनं 2022 मध्ये कंगना रणौतनं होस्ट केलेल्या रिअॅलिटी शो 'लॉक अप सीझन 1' मध्ये भाग घेतला होता. तेव्हा ती बरीच चर्चेत आली होती. काही आठवड्यांपूर्वी, पूनम पांडेनं मालदीवचे शूट अचानक रद्द करून, तिथे पुन्हा शूट करण्यास नकार दिल्यामुळंही ती चर्चेत आली होती. मालदीव तिला आवडत असले तरी ती शूटिंगसाठी जाणार नाही, असे तिने सोशल मीडियावर म्हटलं होतं. शूटिंगसाठी लक्षद्वीपचा पर्याय योग्य असल्याचंही ती म्हणाली.
हेही वाचा -
- करीना कपूरने '12th फेल' टीमला म्हटले 'लिजेंड्स', विक्रांत मॅसीची उत्सफूर्त प्रतिक्रिया
- 'नॅशनल जिजू' निक जोनासबरोबर ओरीने दिली 'त्याची'च सिग्नेचर पोज
- हृतिक - दीपिका स्टारर 'फायटर'ची लाँग वीकेंडनंतर कमाईत घसरण सुरू