महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोण, राम चरणसह भारतीय सेलिब्रिटींनी 'गो फॉर ग्लोरी'साठी केला अ‍ॅथलीट्सचा जयजयकार - Paris Olympics 2024

Paris Olympics 2024: पॅरिसमध्ये 2024 समर ऑलिम्पिक सुरू झाल्यानंतर दीपिका पदुकोण, अजय देवगण, राम चरण आणि सुनील शेट्टी यांच्यासह भारतीय फिल्म सेलेब्रिटींनी सोशल मीडियावर आपला पाठिंबा शेअर केला आहे. त्यांनी खेळाडूंच्या सहभागाचा आनंद साजरा केला आणि 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होत असलेल्या जागतिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी टीमला प्रोत्साहन दिलं.

Paris Olympics 2024
पॅरीस ऑलिंपिक 2024 ((ANI/IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 12:19 PM IST

मुंबई - पॅरिसमध्ये 2024 च्या समर ऑलिंपिकला सुरूवात होत असताना, भारतीय फिल्म सेलेब्रिटींनी उत्साहानं सोशल मीडियावर देशाच्या खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. फ्रान्सच्या राजधानीमध्ये या आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धेचा शुक्रवारी भव्य आणि नेत्रदीपक उद्घाटन समारंभ पार पडला.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडूंची टीम हजर असून चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्ती देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मनापासून पाठिंबा दर्शवत आहेत. 26 जुलै रोजी दीपिका पदुकोणनं ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये भारतीय खेळाडू पीव्ही सिंधू आणि शरथ कमल यांनी सीन नदीकाठी राष्ट्रांच्या परेडचं नेतृत्व केलं होतं. यावेळी 117 बलवान भारतीय खेळाडूंची तुकडी एका बोटीवर अभिमानानं तिरंगा फडकवताना दिसली.

विशेष म्हणजे, दीपिकाचे वडील आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण हे देखील भारतीय टीमचा भाग होते. दीपिकाच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ऑलिम्पिक 2024 हा हॅशटॅग समाविष्ट आहे आणि कबीर खानच्या 83 चित्रपटातील "लेहरा दो" हे गाणं या पोस्टमध्ये पार्श्वभागात वाजत आहे.

आगामी सिंघम अगेन मधील दीपिकाचा सहकलाकार अजय देवगण यानंही भारतीय खेळाडूंना पाठींबा देण्यासाठी त्याच्या सोशल मीडिया एक्स हँडलवर पोस्ट केली आहे. आपलं खेळाडू राष्ट्रीचा अभिमान वाढवतील हा विश्वास त्यानं व्यक्त केला.

दरम्यान, तेलगू सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनीही शनिवारपासून सुरू झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली. या कार्यक्रमातील काही क्षण त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राम चरणनं आयफेल टॉवर पार्श्वभूमीत असलेल्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली, तर उपासनानं सुंदर पांढऱ्या पोशाखात ऑलिम्पिकच्या ठिकाणी फिरतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये फ्रेंच संगीतकार लाईव्ह परफॉर्म करताना दिसतात.

पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचे पोस्टर असलेली इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत सुनील शेट्टीही आनंदात सामील झाला. त्यानं भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्राबद्दलचा अभिमान व्यक्त केला, त्यांना "गो फॉर ग्लोरी" साठी प्रोत्साहित केलं.

26 जुलैपासून सुरू झालेले 2024 समर ऑलिंपिक 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. भारतीय खेळाडूंचं पथक जागतिक स्तरावर स्पर्धा करत असताना त्यांना आम्ही आमच्या शुभेच्छा देत आहोत.

हेही वाचा -

  1. शानदार सोहळ्यानं पॅरिस ऑलिम्पिकचं उद्‌घाटन; भारतीय पारंपरिक वेशभूषा अन्... 'या' गोष्टींनी वेधलं लक्ष - Paris Olympics 2024
  2. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज हे भारतीय खेळाडू दाखवणार प्रतिभा; कधी होणार सामने, वाचा सविस्तर - Paris Olympics 2024
  3. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चांगलं यश मिळेल; ऑलिम्पिक नेमबाज अंजली भागवत यांना विश्वास - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details