महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

परिणीती चोप्राच्या सेल्फीवर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव; काहींनी केलं ट्रोल - सेल्फी शेअर केला

Parineeti chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रानं तिच्या इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

Parineeti chopra
परिणीती चोप्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 8:16 PM IST

मुंबई -Parineeti chopra : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. तिनं 24 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय पक्ष आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते राघव चड्ढा यांच्याशी लग्न केलं. परिणीती लग्नानंतरही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता परिणीती चोप्रानं आज 23 जानेवारीला तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर सेल्फी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ती न्यूड मेकअपमध्ये दिसत आहे. आता तिच्या सेल्फीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत.

परिणीती चोप्रानं सेल्फी केला शेअर :परिणीती चोप्रानं इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या सेल्फीमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. या सुंदर सेल्फीवर परिणीती चोप्रानं कॅप्शन देत लिहिलं, ''विनाकारण काढलेला सेल्फी''. या फोटोमध्ये परी खूप देखणी दिसत आहे. परीचे काही चाहते तिच्या सेल्फीवर रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत. एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलंय, ''तुला कोणाची नजर नाही लागो''. दुसरा चाहता लिहिलं, ''तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला तुझे फोटो खूप आवडतात.'' याशिवाय तिला अनेक यूजर्स ट्रोल करत आहेत. एकानं या पोस्टवर लिहिलं, ''सिंदूर आणि मंगळसूत्र कुठे आहेत?'' आणखी एकानं लिहिलं, ''आम्ही विनाकारण कमेंट्स करत आहोत.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत.

परिणीती चोप्राचं वर्कफ्रंट : लग्नानंतर परिणीती चोप्रा अक्षय कुमारसोबत 'मिशन रानीगंज' या चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात तिनं अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. आता परिणीती तिच्या पुढच्या प्रोजेक्ट 'चमकिला'मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती पंजाबी टॉप गायक दिलजीत सिंगच्या 'चमकिला' या पात्राच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये दिलजीत सिंग आणि परिणीती चोप्राशिवाय निशा बानो, राहुल मित्रा, अंजुम बत्रा, विपिन कट्याल आणि इतर कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन इम्तियाज अली करत आहे.

हेही वाचा :

  1. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टीनं केला अथिया आणि जावई केएल राहुलवर प्रेमाचा वर्षाव
  2. कंगना राणौतनं 'एमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख केली जाहीर
  3. निर्मात्यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ'चं पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या टीझर रिलीजबद्दल केला खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details