मुंबई - Ragneeti 1st wedding anniversary :अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला आज 24 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालंय. गेल्या वर्षी राजस्थानच्या उदयपूरमध्ये या जोडप्यानं शाही पद्धतीनं लग्न केलं होतं. या जोडप्याच्या लग्नाला राजकारणी, खेळाडू आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावली होती. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त, परिणीतीची आई, भाऊ आणि तिचा मित्र राजीव अदातियानं शुभेच्छा दिल्या आहेत. राजीव अदातिया हा 'बिग बॉस 15'चा माजी स्पर्धक आहे. मंगळवारी, परिणीतीची आई रीना चोप्रा आणि दोन्ही भावांनी या जोडप्याला शुभेच्छा देणारी संयुक्त पोस्ट शेअर केली.
परिणीतीच्या कुटुंबियांनी केली पोस्ट : परिणीतीच्या कुटुंबानं लग्नाच्या फोटोंची मालिका शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावाना देखील एका नोटद्वारे जोडले आहेत. कॅप्शनमध्ये परिणीतीचे आभार मानत त्यांनी लिहिलं की, 'एका वर्षापूर्वी आणि ज्या दिवशी तू आमच्यासाठी एक मुलगा आणण्याच्या रस्त्यावर उतरली होती. तू आम्हाला दिलेली सर्वात मौल्यवान भेट टिश. आम्ही देवाचे आभार मानतो की, तू आम्हाला एकत्र आणले. राघवला आमच्या आयुष्यात आणल्याबद्दल टिशचं आभार. तुम्ही तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी यापेक्षा चांगले काहीही निवडू शकत नाही.' याशिवाय जावई राघव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कुटुंबानं पुढं लिहिलं, 'राघव, आमच्या अद्भुत, वेड्या मुलीवर प्रेम केल्याबद्दल आणि आम्हा सर्वांना तुमचे कुटुंब म्हणून स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमच्या संयमानं, विनोदानं आणि परिपक्वतेनं आमचे जीवन दररोज सुंदर बनवत आहात. त्या दिवशी आम्हाला मुलगी मिळाली नाही, पण मुलगा मिळाला. तुमचे एकमेकांबद्दलचे प्रेम, समज आणि आदर दिवसेंदिवस वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही तुम्हा दोघांवर प्रेम करतो. वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. लग्नाला एक वर्ष झाले यावर विश्वास बसत नाही.'